Marathi News> हेल्थ
Advertisement

भारतीय मार्केटमध्ये दाखल झालं वजन कमी करणारं औषध, आपोआप भूक होईल कमी; जाणून घ्या किंमत

Weight Loss Medicine: डेन्मार्कमधील औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने (Novo Nordisk) भारतात वजन कमी करणारं औषध लाँच केलं आहे, जे भारतातील पहिले आणि एकमेव वजन कमी करणारं औषध आहे.   

भारतीय मार्केटमध्ये दाखल झालं वजन कमी करणारं औषध, आपोआप भूक होईल कमी; जाणून घ्या किंमत

Weight Loss Medicine: सध्याच्या काळात लठ्ठपणा ही फार मोठी समस्या झाली आहे. लठ्ठपणासोबत डायबेटिजसह तसंच ह्रदयाशी संबंधित अनेक आजारही बळावतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. लोकांची हीच समस्या लक्षात घेत डेन्मार्कमधील औषध कंपनी नोवो नॉर्डिस्कने (Novo Nordisk) मंगळवारी भारतात वजन कमी करणारं औषध लाँच केलं आहे. या औषधाचं नाव वेगोवी (Wegovy) आहे, जे एक इंजेक्टेबल सेमाग्लुटाइड आहे.

वेगवेगळ्या डोसमध्ये उपलब्ध आहे औषध

आठवड्यातून एकदा घेतलं जाणारं ग्लुकागॉनसारखे पेप्टाइड-1 रिसेप्टर अ‍ॅगोनिस्ट (GLP-1 RA) वेगोवी हे भारतातील पहिले आणि एकमेव वजनावरील औषध आहे जे दीर्घकाळासाठी वजनाचं व्यवस्थापन करतं आणि मेजर एडवर्स कार्डियोवास्कुलर इवेंट्सचा (MACE) धोका कमी करतं. हे पेनसारखं उपकरण आहे जे वापरण्यास सोपं आहे. ते 0.25 मिलीग्राम, 0.5 मिलीग्राम, 1 मिलीग्राम, 1.7 मिलीग्राम आणि 2.4 मिलीग्राम अशा वेगवेगळ्या डोसमध्ये उपलब्ध आहे.

किंमत किती?

0.25 मिलीग्राम, 0.5 मिलीग्राम आणि 1 मिलीग्रामसाठी औषधाची किंमत 17,345 रुपयांपासून सुरू होते, तर 1.7 मिलीग्रामची किंमत 24,280 रुपये प्रति पेन आणि 2.4 मिलीग्रामची किंमत 26,015 रुपये प्रति पेन आहे. हे केवळ प्रिस्क्रिप्शनवर मिळणारं औषध असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. म्हणजे हे औषध घेण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक असणार आहे. वेगोवी लठ्ठपणा किंवा जास्त वजनाने ग्रस्त असलेल्या लाखो भारतीयांना दिलासा देऊ शकतं.

कशाप्रकारे काम करतं औषध?

INDIAB च्या एका अभ्यासानुसार, जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या लोकसंख्येच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे सामान्य लठ्ठपणाने ग्रस्त लोकांची संख्या 254 मिलियन आहे, तर 351 मिलियन लोक पोटाच्या लठ्ठपणाने ग्रस्त आहेत.

वेगोवी एक GLP-1 रिसेप्टर एका प्रकारचं प्रथिन आहे. ज्यामुळे भूक कमी लागते आणि खाण्याची इच्छा कमी होते. ज्यामुळे त्याचा वजनावर प्रभाव दिसू लागतो. ते इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता देखील सुधारते, ज्यामुळे कार्डिओमेटाबॉलिक प्रणाली सुधारते.

Read More