Marathi News> हेल्थ
Advertisement

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, लगेच कमी होईल वजन

शरीरातील साचलेली चरबी कमी करून त्यातून सुटका मिळवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण यामुळे विविध आजार होण्याची देखील शक्यता आहे.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या वेळी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, लगेच कमी होईल वजन

मुंबई : अनेक वेळा खराब जिवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे लोक आजारी पडतात किंवा लठ्ठपणा सारख्या गंभीर आजारांना ते बळी पडतात. ज्याचा परिणाम फक्त तुमच्या फिटनेसवर होत नाही, तर तुमचा लुकही बिघडतो. त्यामुळे लोक विविध प्रकारचे आहार आणि व्यायामाचे पालन करतात. पण तरीही शरीरातील लठ्ठपणा कमी होत नाही. त्याचबरोबर लठ्ठपणामुळे अनेक आजारही उद्भवू लागतात.

त्यामुळे शरीरातील साचलेली चरबी कमी करून त्यातून सुटका मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही लठ्ठपणापासून मुक्ती मिळवायची असेल, तर रात्रीचे जेवण करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. चला आम्ही तुम्हाला येथे सांगू की तुम्ही तुमचा लठ्ठपणा कसा कमी करू शकता?

वजन कमी करण्यासाठी जेवताना हे नियम पाळा

सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करा

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर रात्रीचे जेवण सुर्यास्तापूर्वी करा. याचे कारण म्हणजे तुम्हाला रात्री अन्न पचण्यास त्रास होतो. अशा स्थितीत तुमचे वजन वाढू नये असे वाटत असेल तर रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करावे हे लक्षात ठेवा.

रात्रीच्या जेवणात बाजरी खा

बाजरीचा डोसा, बाजरी पुलाव, या गोष्टी रात्रीच्या जेवणात कराव्यात. ते पचायला सोपे आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. एवढेच नाही तर याचे सेवन केल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते.

संध्याकाळी पौष्टिक आहार घ्या

संध्याकाळच्या वेळी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे तुम्ही रात्री कमी जेवता. अशा परिस्थितीत तुम्ही संध्याकाळी फळे किंवा दुध पिऊ शकता.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)

Read More