Marathi News> हेल्थ
Advertisement

महिलांना White Discgarge का होतो अन् कधी असते चिंतेची बाब? जाणून घ्या कारण, लक्षण आणि उपाय

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये पांढरा स्त्राव होण्यामागे अनेक कारणं असतात. जरी ही एक सामान्य बाब असली तरी आरोग्यासाठी अनेक वेळा हो आजाराचे एक क्षणदेखील असतं.

महिलांना White Discgarge का होतो अन् कधी असते चिंतेची बाब? जाणून घ्या कारण, लक्षण आणि उपाय

महिला यांना आरोग्यासाठी संबंध अनेक समस्यांमधून जावं लागतं. त्यांना महिन्यातून मासिक पाळीचा त्रास चार ते पाच दिवस सहन करावा लागतो. त्यात एक समस्या असते ती म्हणजे पांढरा स्त्राव..महिलांमध्ये पांढरा स्त्राव म्हणजेच White Discgarge ही सर्वात सामान्य समस्यांपैकी एक मानली जाते. पांढरा स्त्राव ही अस्वस्थतेची बावना वाढवत नाही तर खाजगी भागात खाज सुटणे, यीस्ट इन्फेक्शन या त्रासातूनही त्यांना जावं लागतं. कधीकधी हा त्रास एवढा होतो की, तापही येतो. तर ही समस्या गंभीर पण असते. पण अनेक वेळा महिला याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही सामान्य वाटणारी समस्या कधी गंभीर होते, या समस्येमागील कारणं, लक्षणं आणि उपाय जाणून घ्या. 

'ही' समस्या महिलांना का होते?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये पांढरा स्त्राव होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यापैकी काही सामान्य आहेत, तर काही आरोग्याशी संबंधित समस्या दर्शवू शकतात. तज्ज्ञ सांगतात संभोगापूर्वी पांढरा स्त्राव होणे पूर्णपणे सामान्य आहे. लैंगिक उत्तेजना वाढत असताना, योनी आणि गर्भाशय ग्रीवामध्ये असलेल्या ग्रंथींमधून या प्रकारचा स्त्राव वाढतो. तसंच, मासिक पाळीच्या सुरुवातीला आणि शेवटी पांढरा स्त्राव होतो, जो सामान्य आहे. मात्र, या दोन परिस्थितींशिवाय जर तुम्हाला अशा समस्या येत असतील, तर त्यामागे खराब आरोग्य, मूत्रमार्गाचा संसर्ग, लैंगिक संक्रमित रोग, गोनोरिया, बॅक्टेरियल योनिओसिस इत्यादी गंभीर कारणे असण्याची शक्यता तज्ज्ञ सांगतात. 

हेसुद्धा वाचा - पायांच्या ‘या’ बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका! एक महिन्यापूर्वीच दिसतात हार्ट अटॅक येणाचे लक्षणं

काळजी करण्याची गोष्ट कधी असते?

तज्ज्ञांच्या मते, जर स्त्रावचा रंग पांढऱ्याऐवजी हलका तपकिरी, गंजसारखा, हिरवा किंवा पिवळा असेल तर तो गंभीर चिंतेचा विषय असतो. त्याशिवाय, जर पांढरा स्त्राव खूप जास्त असेल तर अशा परिस्थितीतही तुम्हाला डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. जास्त स्त्राव झाल्यामुळे योनीतून खाज येते आणि संसर्गाचा धोका वाढतो, असं तज्ज्ञ सांगतात. 

हे उपाय करा!

मेथीचे दाणे

अनेक आरोग्य अहवालनुसार मेथीचे दाणे पांढऱ्या स्त्रावची समस्या कमी करण्यास फायदेशीर मानले गेले आहे. यासाठी 2 चमचे मेथीचे दाणे 2 ग्लास पाण्यात पाणी उकळा. हे पाणी अर्ध होईपर्यंत छान उकळून घ्या. त्यानंतर पाणी कोमट झाल्यावर त्याच सेवन करा.

धणे

मेथीच्या दाण्यांशिवाय, धणेचे पाणी देखील फायदेशीर मानले जाते. यासाठी, एक चमचा धणे रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा. असे केल्याने तुम्हाला 2 ते 3 दिवसांत आराम मिळतो.

गुसबेरी किंवा आवळा

आवळा पांढऱ्या स्त्रावाची समस्या कमी करण्यास देखील मदत करू शकतो. तुम्ही ते कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता - कच्चे, पावडर, जाम किंवा घरगुती कँडीज.

या तीन गोष्टींचे सेवन केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो, मात्र ते योग्य वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. जर स्त्राव जास्त असेल तर योग्य सल्ला आणि उपचारांसाठी डॉक्टरांकडे नक्की जा. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

Read More