Marathi News> हेल्थ
Advertisement

महिला वर्गाला टेन्शन देणारी माहिती; 'या' सवयींमुळं तिशीतच चेहऱ्यावर दिसेल म्हातारपण, वेळीच सावध व्हा!

Women Anti Aging Tips  : प्रत्येक महिलेची सौंदर्याची परिभाषा ही अतिशय वेगळी असून, काही महिला मात्र कळत नकळत दैनंदिन धकाधकीमध्ये स्वत:ची काळजी घेणंच विसरून जातात.   

महिला वर्गाला टेन्शन देणारी माहिती; 'या' सवयींमुळं तिशीतच चेहऱ्यावर दिसेल म्हातारपण, वेळीच सावध व्हा!

Why Some Women Age Faster: वेळ आणि वाढतं वय या गोष्टी कोणासाठीही थांबत नाहीत. ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही वेळेआधी जाणवणारं म्हातारपण कोणाला आवडेल? गेल्या वर्षांमध्ये संपूर्ण जगाचाच भवितव्याच्या दिशेनं वाटचाल करण्याचा वेग पाहता या वेगाशी ताळमेळ साधण्याचाच प्रयत्न प्रत्येकजण करताना दिसत आहे. घड्याळाच्या काट्यावर प्रत्येकजण धावत आहे. पण, या संपूर्ण धकाधकीमध्ये अप्रत्यक्षरित्या स्वत:ची काळजी घ्यायला मात्र बहुतांश मंडळींना विसर पडत आहे. 

महिलांमध्ये या अजाणतेपणे होणाऱ्या निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम दिसत असून, फार कमी वयातच त्यांचं वाढतं वय चेहऱ्यावर दिसू लागतंय ही बाब निरीक्षणातून समोर आली आहे. जीवनशैलीतील काही चुकीचे निर्णय यास कारणीभूत ठरत असून, आहारतज्ज्ञ डॉ. रिद्धिमा खमेसरा (Dr. Ridhima Khamesra) यासंदर्भातील काही महत्त्वाची कारणं अधोरेखित केली आहेत. 

काय आहेत कमी वयातच महिलांना म्हातारपण येण्याची कारणं? 

व्यायामाचा अभाव- शारीरिकदृष्ट्या किमान हालचाली, शून्य व्यायाम अशा सवयी असणाऱ्या महिलांचं वाढतं वय लगेच दिसू लागलं. व्यायामाच्या अभावामुळं शरीर निस्तेज होऊ लागतं. उलटपक्षी नियमित व्यायामामुळं कॉगनिटिव फंक्शनमध्ये सुधारणा होऊन हृदयाचं आरोग्यही उत्तम राहतं. 

ताणतणाव- महिलांच्या शरीरावर ताणतणावाचा वाईट परिणाम होऊन वय वाढण्याचं हे आणखी एक मुख्य कारण. तणावामुळं अस्वस्थता वाटते आणि शरीराला सूज येते. तणावामुळं रिअॅक्टिव्ह स्पेसीज तयार होऊन त्यामुळं शरीरातील इतर पेशींचं नुकसाम होऊन वय वेगानं वाढू लागतं. 

कमी झोप - सुदृढ प्रौढांनी दिवसभरात 7 ते 9 तासांची झोप घेणं अपेक्षित असंत. निश्चिंत आणि अखंड झोपेमुळं शरीरातील पेशींची सुधारणा होण्यास मदत होते, हार्मोन्स संतुलित राहतात. मात्र एखाद्या व्यक्तीची झोप कमी असल्यास त्याचा थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होऊन प्रोटेक्टीव्ह डीएनए कॅपही प्रभावित होतो. 

आहाराच्या वाईट सवयी- आहारामध्ये एंटीऑक्सिडेंट (बेरीज, पालेभाज्या), ओमेगा-3 (मासे), आणि कोलेजनची पुरेशी क्षमता असणारे पदार्थ अँटी एजिंगसाठी मदत करतात. तर, प्रोसेस्ड शुगर, तळलेले पदार्थ अशा गोष्टींच्या सेवनानं त्वचा आणि शरीरातील इतर अवयवांवर दुष्परिणाम होतात. 

एकटेपणा- सततच्या एकटेपणामुळं मेंदूची कार्यक्षमता कमी होते. उलटपक्षी एखादी व्यक्ती सतत इतरांसोबत वावरत असेल, मित्रमंडळंच्या संपर्कात असेल तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून डिमेंशियाचाही धोका कमी होतो. 

राग- एका निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार अती रागामुळंही वय वेगानं वाढू लागतं. त्यामुळं राग व्यक्त करणं, एखाद्या व्यक्तीशी संवाद साधणं किंवा ध्यानधारणेची मदत घेणं अशा सवयींमुळं वाढत्या वयाचा वेग मंदावता येतो. 

(वरील माहिती व्यक्तीगत निरीक्षण आणि संदर्भांवर आधारित असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

Read More