Marathi News> हेल्थ
Advertisement

Skin care Tips: हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा

Winter tips for skin: हिवाळ्यात थंडीमुळे त्वचेची आद्रता कमी होते. यामुळे या दिवसात त्वचेची काळजी घेणे गरजेचं असतं. त्यामुळे..  

Skin care Tips: हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असेल तर करा ‘या’ गोष्टींचा वापर, लगेच जाणवेल फायदा

Winter Health Tips: हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काही घरगुती उपायही अवलंब केल्यास लगेच फायदा दिसून येतो. त्वचेची निगा राखण्यासाठी कॉस्मेटिक उत्पादनांचा (Cosmetic Products) वापर त्वचेला पुरेसा नसतो. तर तुम्हाला काही प्रभावी घटकांचा वापर करावा लागतो. त्यामुळे तुमची त्वचा (Winter tips for skin) निरोगी राहते. 

हिवाळ्यात थंडीमुळे त्वचेची (Skin) आद्रता कमी होते. यामुळे या दिवसात त्वचेची काळजी घेणे गरजेचं असतं. हिवाळ्यात त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी दुधाची साय खूप फायदेशीर ठरते. दुधातून तयार होणारी साय कोरड्या त्वचेसाठी फारच प्रभावी ठरते. तसेच साय त्वचेवर नैसर्गिक मॉइश्चराईझर म्हणून काम करते. (Winter tips for skin if you have dry use these things you will realize the benefits immediately marathi news)

दुधाची साय त्वचेवर लावल्यानं कोरडेपणा दूर होतो, रंग सुधारतो तसेच त्वचेच्या अनेक समस्यांवर उपाय होतात. चेहऱ्यावर क्रीम वापरून वृद्धत्वाची लक्षणं देखील कमी करता येतात.

साय लावण्याचे फायदे -

सकाळी आणि संध्याकाळी त्वचेला साय लावून मसाज केल्यानं त्वचा चमकदार, मुलायम आणि गुळगुळीत होते. मसाजिंग केल्यानं त्वचेच्या मृत पेशी निघून जातात आणि त्वचा तरुण आणि सुंदर दिसते. साय लावल्यानं त्वचेची छिद्रे खोलवर साफ होतात. तसेच नियमित वापर केल्यानं त्वचेवर साचलेली घाण साफ होऊन त्वचा चमकदार दिसण्यास मदत होते.

आणखी वाचा - फ्लाइंग वडापाव तुम्ही कधी पाहिला आहे का? Video पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

दरम्यान, दुधातील सायीचा स्क्रब म्हणूनही वापरू शकतो. त्यात एक चमचा रस मिसळा आणि त्वचेवर 15 मिनिटे लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा मग टॅनिग दूर होईल. साय आणि लिंबाचं मिश्रण स्कीनवर हळुवार लावा, नंतर त्यांना सुकू द्या मग थंड पाण्याने चेहरा धुवा. याचा नियमित वापर केल्याने डार्क स्पॉट्स दूर होतात आणि कोरड्या त्वचेची समस्याही जाणवत नाही.

Read More