Marathi News> हेल्थ
Advertisement

Fish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...

Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे. 

Fish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...

Health News : चमचमीत मासा पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना, आणि का तोंडाला पाणी सुटू नये... ते टेस्टी आणि हेल्दी फूड, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. भरपूर प्रोटीनने भरलेला मासा खाण्याची आवड प्रत्येकाला होते. भरपूर प्रथिनांनी भरलेले ते सिफूड आहे आणि आपल्या शरीरासाठी ते खूप फायदेशीर असे मानले जाते. पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार जे लोक जास्त मासे खातात त्यांना कर्करोगाचा धोका वाढू शकतो. जे लोक मांसाहार करतात त्यांच्या आहारात अंडी, चिकन, मटण, सीफूड, डुकराचे मांस, मासे यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे. यातील बहुतांश प्रथिने माशांमध्ये आढळतात.. 

 जे लोक आठवड्यातून 300 ग्रॅम मासे खातात त्यांना मेलेनोमा (Melanoma) होण्याचा धोका असू शकतो. याबाबत गेल्या वर्षभरात 62 वर्षांच्या 4 लाख 91 हजार 367 ज्येष्ठ नागरिकांनी तळलेले आणि न तळलेले टुना मासे (Tuna fish) खाल्ले होते. यावर संशोधन करण्यात आले होते की, अति मासे खाणाऱ्या व्यक्तिंमधील अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरण त्वचेच्या पेशींच्या डीएनएचे नुकसान करत आहेत. परिणामी त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त आहे. अतिप्रमाणात मासे खाल्ल्याने मेलेनोमा या कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असे या संशोधनात म्हटले आहे. 

ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासातून समोर

अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये (Brown University, USA) केलेल्या अभ्यासानुसार, माशांच्या अतिसेवनामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका (Risk of cancer) वाढू शकतो. 4 लाख 91 हजार 367 लोकांवर केलेल्या या अभ्यासात हे समोर आले की, जे लोक जास्त खातात त्यांच्या त्वचेच्या बाहेरील थर मासे असामान्य पेशींचा धोका वाढू शकतो. संशोधकांनी या पेशींना मेलेनोमा असे नाव दिले आहे. जो कर्करोगापूर्वीचा एक प्रकार आहे. आता या संशोधकांनी लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून किमान दोनदा मासे खावेत. तळलेले मासे खा, मासे खाल्ल्यानंतरच त्वचेवर काही परिणाम जाणवला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

यांना अधिक धोका

संशोधनात असे दिसून आले की, वाढलेले वजन, धूम्रपान, मद्यपान, आहार, कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आणि अतिनील किरणोत्सर्गाचा संपर्क यासारख्या डेटावर परिणाम करणारे घटक विचारात घेतले. निष्कर्षांमध्ये असे आढळून आले की, 1 टक्के लोकांना मेलेनोमाचा धोका वाढला आहे. पातळी, 0.7 टक्के लोकांना मेलेनोमाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या लोकांमध्ये माशांचे अतिरिक्त सेवन त्वचा कर्करोगाच्या जोखमीशी संबंधित आहे.

Read More