Marathi News> भारत
Advertisement

खास मराठीतून शुभेच्छा देऊन साजरा करा ख्रिसमस

जगभरात वेगवेगळ्या प्रकारे ख्रिसमस साजरा केला जातो. 

खास मराठीतून शुभेच्छा देऊन साजरा करा ख्रिसमस

मुंबई : जगभरात वेगवेगळ्या प्रकारे ख्रिसमस साजरा केला जातो. 

नाताळ हा एक प्रमुख ख्रिश्चन सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण ऐवजी एपिफनी ६, ७ किंवा १९ जानेवारीला देखील साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप ज्युलियस पहिलाने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.

fallbacks

 त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात.

fallbacks

भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही वैविध्य दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

fallbacks

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.

fallbacks

तसेच हल्ली हा ख्रिसमसचा दिवस कॉर्पोरेट सेक्टरमध्ये देखील साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तसेच "सिक्रेट सँटा" सारखा खेळ खेळला जातो. हा दिवस सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो. या खेळात समोरच्या व्यक्तीला सरप्राईज गिफ्ट दिलं जातो. आणि गिफ्ट देणारी व्यक्ती ही सिक्रेट सँटा असते. 

fallbacks

fallbacks

fallbacks

परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशु‍द्धीचे कारण असते, म्हणून रोमन कॅथोलिक्स संप्रदायाचे लोक एक डिसेंबर पासून पंचवीस डिसेंबरपर्यंत फक्त शाकाहारी भोजनाचे सेवन करतात.

Read More