Marathi News> भारत
Advertisement

बहिणीने रिमोट दिला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलीने लावला गळफास

वाद कधी कोणत्या टोकाला पोहचेल हे काही सांगता येणार नाही. 

बहिणीने रिमोट दिला नाही म्हणून 10 वर्षाच्या मुलीने लावला गळफास

मुंबई : वाद कधी कोणत्या टोकाला पोहचेल हे काही सांगता येणार नाही. सेक्टर 12 मध्ये हैराण करणारी ही घटना आहे. खेळत असताना 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10वर्षाची मुलगी आपल्या मोठ्या बहिणीकडून रिमोट मागत होती. बहिणीने रिमोट न दिल्यामुळे ती उठून दुसऱ्या खोलीत खेळायला गेली. मात्र खेळत असताना ओढणी गळ्याला बांधली आणि तिला फास लागला. ही घटना कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने मुलीला मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारा दरम्यान डॉक्टरांनी या मुलीला मृत घोषित केलं. 

मोठ्या बहिणीकडे मागिताला होता रिमोट 

मिळालेल्या माहितीनुसार, या 10 वर्षाच्या मुलीने मानुषी रावतने आपल्या मोठ्या बहिणीकडे रिमोट मागितला होता. मात्र मोठ्या बहिणीने विरोध केल्यामुळे दुसऱ्या खोलीत खेळायला गेली आणि हा प्रकार घडला. 

घरात एकट्या होत्या मुली 

मानुषी आपल्या मोठ्या बहिणीसोबत घरी खेळत होती. या दोन्ही मुलींना आई वडिल एकटेच ठेवून कामाला निघून गेले होते. वादळ आल्यामुळे या दोन्ही मुलींच्या शाळा बंद होत्या. 

Read More