Murder Case : दिवसेंदिवस गुन्हेगारी जगातून धक्कादायक घटना समोर येत आहे. नवी दिल्लीतील समयपूर परिसरातून भयानक आणि क्रूर कृत्य समोर आले आहे. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. तळमस्तकातील राग डोक्यात जाईल, अशी घटना तुम्हाला निशब्द करेल. दिल्लीतील समयपूर परिसरातील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. या मुलाची 24 वेळा चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. (14 year old boy gang raped by 13 people Body found naked delhi crime news in martahi )
1 जुलै रोजी पोलिसांना एक पीसीआर कॉलवरून या धक्कादायक घटनेची माहिती देण्यात आली. या कॉलमध्ये पोलिसांना सांगण्यात आलं की, एका नाल्यात मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना नग्नअवस्थेत असलेला मृतदेह सापडला. या मृतदेहवर त्यांना गळ्यात एक स्कार्फ बांधला आढळून आला. तसंच शरीरावर अनेक ठिकाणी चाकूचे घाव दिसले. सुरुवातीला हे प्रकरण हत्या आहे असं प्रत्यक्षदर्शी दिसत होतं. पण पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. रिपोर्टमध्ये उघडकीस आलं की, मुलाच्या शरीरावर चाकूचे 24 निशाण तर होते त्याशिवाय त्यांचं लैंगिक शोषण करण्यात आल्याच समोर आलं.
14 वर्षांच्या मुलावर 13 जणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या 13 लोकांमध्ये 6 अल्पवयीन आहेत. पोलिसांनी जी सखोल चौकशी केली त्यात असं दिसून आलं की, मुख्य आरोपी कृष्णा उर्फ भोला (19) ला संशय होता. पीडित मुलाने दिवाळी दरम्यान त्याच्यावर हल्ला करणाऱ्या मुलांना त्याच्याविषयी माहिती दिली होती. याचाच बदला घेण्यासाठी कृष्णाने त्याच्या मित्रांसोबत मिळून त्या मुलाच्या निर्घृण हत्येचा कट रचला. 29-30 जूनच्या रात्री आरोपी वीर चौक बाजारात पोहोचले. तेथून त्या मुलाचं मित्रांच्या समोर अपहरण केलं त्यानंतर त्याला एका अज्ञात स्थळी घेऊन गेले. तिथे त्याचे कपडे काढून नंतर त्याचं लैंगिक शोषण करण्यात आलं. त्यानंतर चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली.
पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली की, हत्येनंतर काही आरोपी हरिद्वारला पळून जाऊन कांवड यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्याच प्लॅन केला. त्या ठिकाणाहून इतर तीन आरोपींना मोनू आणि दोन अल्पवयीनला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान या आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल दिली असून तीन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.