Marathi News> भारत
Advertisement

14000 कोटींच्या ठेवी, 7,123 एकर जमीन; तिरुपती बालाजी मंदिराची संपत्ती अखेर जाहीर

तिरुपती देवस्थानम ट्रस्टने एकूण संपत्ती आणि मालमत्तेबाबत माहिती दिलीय

14000 कोटींच्या ठेवी, 7,123 एकर जमीन; तिरुपती बालाजी मंदिराची संपत्ती अखेर जाहीर

Tirupati Balaji Temple : आंध्र प्रदेशातील (andhra pradesh) तिरुपती बालाजी मंदिर (tirupati temple) देशातील सर्वात श्रीमंत मंदिर (temple) मानलं जाते.  तिरुपती बालाजी हे भगवान व्यंकटेश्वराचे मंदिर आहे. भगवान व्यंकटेश्वराला विष्णूचा अवतार मानले जाते. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या तिरुपती देवस्थानम (TTD) संस्थेने एकूण संपत्ती आणि मालमत्तेबाबत माहिती दिलीय. TTD चे अध्यक्ष व्हाय बी सुब्बा रेड्डी यांनी मंदिराच्या एकूण संपत्तीबाबत माहिती दिली. तिरुपती देवस्थानम मंदिर ट्रस्टच्या देशभरात 960 मालमत्ता आहेत ज्यांची किंमत 85,705 कोटी रुपये आहे. (Tirupati Balaji Temple property details)

तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी म्हणाले की, देशात तिरुपती देवस्थानाच्या 960 मालमत्ता आहेत ज्यांची किंमत 85,705 कोटी रुपये आहे.

दिवसेंदिवस तिजोरीत वाढ होत असताना तिरुपती देवस्थानमने अमेरिकेसारख्या काही देशांच्या विविध भागात मंदिरे उघडली आहेत. मंदिराचे देशभरात 7,123 एकर जमिनीवर नियंत्रण आहे. 1974 ते 2014 वेगवेगळ्या सरकारांच्या कार्यकाळात, काही अपरिहार्य कारणांमुळे टीटीडी ट्रस्टने 113 मालमत्ता निकाली काढल्या. मात्र, त्यांनी मालमत्ता विकण्याचे सांगितले नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तिरूपती बालाजी देवस्थानाच्या विविध बँकांमध्ये 14 हजार कोटींहून अधिक रुपयांच्या ठेवी आहेत. देवस्थानाकडे 14 टन सोन्याचा साठाही आहे.

दरम्यान, सु्ब्बा रेड्डी यांनी सांगितलं की, "राज्य सरकारच्या आदेशानंतर माझ्या अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाने दरवर्षी संपत्ती आणि मालमत्तेची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे 2021 साली पहिली तर, यावेळी दुसरी श्वेतपत्रिका काढण्यात आली आहे. दोन्ही श्वेतपत्रिका तिरुपती देवस्थानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे."

Read More