Marathi News> भारत
Advertisement

मुलांना Day Care मध्ये ठेवण्याआधी विचार करा! 15 महिन्याच्या बाळाची काय अवस्था झाली पाहा; संपूर्ण अंगभर जखमा

डेकेअरमध्ये 15 महिन्यांच्या बाळाचा अमानुषपणे छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिला बाळाला मारहाण करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.   

मुलांना Day Care मध्ये ठेवण्याआधी विचार करा! 15 महिन्याच्या बाळाची काय अवस्था झाली पाहा; संपूर्ण अंगभर जखमा

सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात आई-वडील दोघंही नोकरीला असल्याने मुलांना डे-केअरमध्ये ठेवलं जातं. कधी ध्येय पूर्ण करण्याच्या हेतूने तर पैसे कमावण्याच्या हेतूने आई-वडील दोघंही नोकरी करण्यासाठी हतबल असतात. अशावेळी इच्छा नसतानाही मुलांसाठी डे-केअरचा पर्याय निवडला जातो. मात्र नोएडामधील डे-केअरमधील घटनेनंतर मुलांना तिथे ठेवणं कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. नोएडामध्ये एका 15 महिन्याच्या बाळाचा अमानुष छळ करण्यात आला आहे. डेकेअरमध्ये ज्या महिलेवर मुलाला सांभाळण्याची जबाबदारी होती, तिनेच त्याचा छळ केला आहे. 

महिला बाळाच्या कानाखाली मारत असल्याचं, उचलून जमिनीवर आपटत असल्याचं सीसीसीटीव्हीत कैद झालं आहे. इतकंच नाही तर बाळाच्या शरिरावर चावे घेतल्याच्या खुणाही आहेत.  

नोएडाच्या सेक्टर 137 मधील पारस टिएरिया निवासी संकुलातील डेकेअरमध्ये ही घटना घडली आहे. रहिवाशांच्या संघटनेद्वारे चालवले जाणारे हे डेकेअर दिल्ली एनसीआरमधील निवासी संकुलांमध्ये चालणाऱ्या अशा असंख्य युनिट्सपैकी एक आहे. पालक त्यांच्या बाळांना कामावर जाताना या डेकेअर युनिट्समध्ये सोडतात आणि परतल्यावर त्यांना घरी घेऊन जातात. या भयानक घटनेमुळे कॉम्प्लेक्समध्ये संताप आणि भीतीचं वातावरण आहे. 

पालकांना प्रथम बाळाच्या मांड्यांवर डाग दिसले होते. पण सुरुवातीला त्यांना काही अ‍ॅलर्जी असावी असं वाटलं आणि दुर्लक्ष केलं. नंतर डेकेअरमधील शिक्षकांनीही त्यांना डाग दाखवले. यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते बाळाला डॉक्टरकडे घेऊन गेले तेव्हा त्यांना हे डाग चावल्यामुळे झाल्याचं सांगण्यात आलं. घाबरलेल्या पालकांनी निवासी संकुलातील अधिकाऱ्यांना डेकेअरचे सीसीटीव्ही फुटेज दाखविण्यास सांगितले. फुटेजमध्ये अटेंडंट बाळाला  चेहऱ्यावर मारत असल्याचे आणि जाणूनबुजून खाली पाडताना दिसत आहे. सीसीटीव्हीत बाळ हतबलपणे रडतानाही दिसत आहे.

यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. डेकेअर मालकाने या घटनेत हस्तक्षेप केला नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यांनी असंही सांगितलं आहे की, जेव्हा त्यांनी त्यांच्या बाळावर झालेल्या अत्याचाराबद्दल त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा मालक आणि परिचारिकाने त्यांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली.

पोलिसांनी बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, अटेंडंटला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. 

NDTV शी संवाद साधताना बाळाचे वडील संदपी यांनी आम्ही 21 जूनपासून बाळाला डेकेअरमध्ये पाठवण्यात सुरुवात केल्याचं सांगितलं. "सोमवारी (4 ऑगस्ट) आम्ही बाळाच्या मांडीवर खुणा पाहिल्या. संसर्ग झाल्याची भीती असल्याने डॉक्टरकडे गेलो असता त्यांनी चाव्याच्या खुणा असल्याचं सांगितलं. यानंतर आम्ही तपास सुरु केला.  आम्ही सीसीटीव्ही पाहिलं असता मुलीसोबत काय झालं आहे हे समजलं. यानंतर आम्ही पोलिसांत गेलो," अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आम्ही दररोज दोन तास बाळाला डेकेअर सेंटरमध्ये सोडत होतो असंही त्यांनी सांगितलं. "आम्हाला सांगण्यात आलं की तीन शिक्षक आहेत आणि ते बाळाला सांभाळतील. आम्हाला बाळ अटेंडंटसोबत असेल याची माहिती नव्हती. डेकेअरचा मालक आम्हाला सांगायचा, 'तुमचे मूल खूप आनंदी आहे'. आम्ही दोन तासांसाठी 2500 रुपये देत होतो," असं तो सांगायचा. आम्हाला दुसऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या मुलालाही डेकेअरमध्ये अशाच प्रकारच्या भयावह परिस्थितीचा सामना करावा लागला अशी माहिती दिली असून,  लवकरच पोलिस तक्रार दाखल करणार आहेत.

"डेकेअर मालक आणि अटेंडंटविरुद्ध कारवाई केली जावी, जेणेकरून अशी घटना दुसऱ्या मुलासोबत घडू नये. ते खूप कठीण दिवस होते. मी कामावर जाऊ शकलो नाही. माझी पत्नी झोपू शकली नाही," असं त्याने सांगितलं. 

चारू नावाच्या महिलेने चालवलेल्या या डेकेअरने एका अल्पवयीन मुलाला अशा संवेदनशील कामासाठी कसे कामावर ठेवले याचाही पोलिस तपास करत आहेत. पोलिस डेकेअरचा परवाना तपासत आहेत आणि जर त्यांना अनियमितता आढळली तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

FAQ

१. डे केअर म्हणजे काय?
डे केअर ही अशी सुविधा आहे जिथे पालक आपल्या मुलांना काही तासांसाठी किंवा पूर्ण दिवसभर देखभाल आणि काळजीसाठी सोडतात, विशेषतः जेव्हा ते कामावर असतात. डे केअर केंद्रांमध्ये मुलांना सुरक्षित वातावरण, खेळ, शिक्षण आणि मूलभूत काळजी पुरवली जाते.

२. डे केअर कोणत्या वयोगटातील मुलांसाठी आहे?

डे केअर केंद्रे सामान्यतः ६ महिन्यांपासून ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी असतात. काही केंद्रे शालेय मुलांसाठी (६-१२ वर्षे) शाळेनंतरच्या देखभालीची सुविधा (After-School Care) देखील पुरवतात.

३. डे केअर केंद्रात कोणत्या सुविधा मिळतात?

डे केअर केंद्रांमध्ये खालील सुविधा मिळू शकतात:मुलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण
खेळ, कला-कौशल्य आणि शैक्षणिक उपक्रम
पौष्टिक आहार आणि जेवण
प्रशिक्षित कर्मचारी आणि देखभालकर्ते
विश्रांती आणि झोपण्याची व्यवस्था
मूलभूत स्वच्छता आणि आरोग्य सुविधा

Read More