Marathi News> भारत
Advertisement

अल्पवयीन मुलीवर नराधमांचा बलात्कार; घटनेचा व्हिडिओही बनवला

 पोलिसांनी गुन्हा तातडीने दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

अल्पवयीन मुलीवर नराधमांचा बलात्कार; घटनेचा व्हिडिओही बनवला

लखनऊ: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर शहरातून खळबळजनक घटना पुढे आली आहे. येथील एका १३ वर्षीय मुलीवर गावातीलच ७ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा तातडीने दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पीडिता आपल्या नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आली होती

प्रसारमाध्यमांनी दिलेल्य वृत्तानुसार, घटना बुलंदशहरमधील जहांगीराबाद येथील आहे. पीडिता आपल्या नातेवाईकांकडे सुट्टी साजरी करण्यासाठी आली होती. दरम्यान, या गावातील ७ नराधमांनी शेतात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधमांची क्रूरता इतक्यावरच थांबली नाही. तर, त्यांनी बलात्कार करतानाचे व्हिडिओ चित्रिकरणही केले. त्यानंतर पीडितेला जिवे मारण्याची धमकी देऊन तिला एकटीला सोडून नराधमांनी पळ काढला.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना पीडता बेशुद्ध अवस्थेत दिसली. त्यानंतर तिला उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधमोहीमही हाती घेतली आहे. बुलंदशहरचे एसपी रईस अख्तर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'गुन्ह्याची नोंद झाली असून, तपास सुरू आहे.' 

बदनाम बुलंदशहर

दरम्यान, बुलंदशहमध्ये याआधीही असा अनेक घटना घडल्या आहेत. याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात खासगी शिकवणीवरून घरी परतत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर राष्ट्रीय महामार्ग ९१वरून अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पीडितेची हत्या करण्यात आली होती. पोलिसांना पीडितेचे मृत शरीर ग्रेटर नोएडाच्या बिल अकबरपूर गावाजवळी एका तळ्यात मिळाली होती.

Read More