Marathi News> भारत
Advertisement

VIDEO : अल्पवयीन मुलीवर सात महिने बलात्कार, आरोपींना वकिलांनी असे बदडले

तब्बत सात महिने एका अल्पवयीन मुलीवर १८ जणांकडून बलात्कार करण्यात आला. 

VIDEO : अल्पवयीन मुलीवर सात महिने बलात्कार, आरोपींना वकिलांनी असे बदडले

चेन्नई : धक्कादायक घटना उघडकीस आलेय. तब्बत सात महिने एका अल्पवयीन मुलीवर १८ जणांकडून बलात्कार करण्यात आला. ही पीडित मुलगी ११ वर्षांची असून ती इयत्ता सातवीत आहे. पीडित मुलीला गुंगीचे औषध, अंमली पदार्थ शीतपेयांमध्ये मिसळून पाजण्यात येत होते. याबाबत कोणाला माहिती दिली किंवा सांगितले तर बलात्काराचा व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी आरोपींकडून दिली जात होती. दरम्यान, आज दुपारी महिला न्यायालयात आरोपींना न्यायालयात करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाच्या आवारात आरोपींना जोरदार माहणार करण्यात आली. यात वकिलांचाही समावेश होता, असे वृत्त एएनआयने दिलेय.

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या १८ जणांना चेन्नईतील न्यायालयात मारहाण करण्यात आली आहे. न्यायालय परिसरातील वकिलांनी ही मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. चेन्नईतील एका इमारतीमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर सात महिन्यांपासून तब्बल ११ जणांकडून सामूहिक बलात्कार सुरु होता. यामध्ये इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचाही समावेश होता. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इमारतीचा सुरक्षा रक्षक, लिफ्टमॅन आणि पाणी पुरवठादाराचाही आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, पीडित मुलीने हा सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितला आणि त्यानंतर हा प्रकार उघड झाला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात आरोपींरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी १८ आरोपींना अटक केली आहे.

Read More