Marathi News> भारत
Advertisement

सुरक्षा रक्षकांची सीमेवरून 2 पाकिस्तानी घुसखोरांना अटक

दोघांकडे मिळाली पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं

सुरक्षा रक्षकांची सीमेवरून 2 पाकिस्तानी घुसखोरांना अटक

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलांनी पंजाबच्या फिरोजपूर सीमेवरून दोन पाकिस्तानी घुसखोरांना अटक केली आहे. या दोघांकडे पाकिस्तानी सेनेची ओळखपत्रं मिळाली आहेत.

एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी चलन, दोन मोबाईल, दोन सिम कार्ड हे देखील जप्त करण्यात आलं आहे. हे दोघेही भारतात घुसखोरी करण्याच्या बेतात होते त्याचवेळी सीमा सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. सीमा सुरक्षा दलाचे जवान गस्तीसाठी गेले होते त्याचवेळी हे दोघे जण भारतात घुसखोरी करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिसले.

आता या दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. हे दोघे नेमक्या कोणत्या कारणांसाठी भारतात येण्याचा प्रयत्न करत होते? एवढ्या मोठ्या प्रमाणात चलन त्यांनी का आणले होते याची चौकशी सीमा सुरक्षा दलातर्फे केली जाते आहे.

Read More