Marathi News> भारत
Advertisement

2 बहिणींचा एकच प्रियकर, तिघांनी मिळून रचला भयानक कट; अवैध संबंधांचे रक्तरंजित...

अवैध संबंधांशी संबंधित एक रक्तरंजित खेळ उघडकीस आला आहे. दोन बहिणी एका ऑटो ड्रायवहरवरच्या प्रेमात पडला होता. या दोन बहिणीपैकी एकचं लग्न झालं तरीही तिचं त्याच्यासोबत प्रेम कायम राहिलं अन् त्यातून सुरु झाला भयानक खेळ.     

2 बहिणींचा एकच प्रियकर, तिघांनी मिळून रचला भयानक कट; अवैध संबंधांचे रक्तरंजित...

बिहारमधील नालंदामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे दोन बहिणीचं एका ऑटो ड्रायव्हरवर प्रेम जुळलं. त्यानंतर जे काही घडलं ते अतिशय भयानक होतं. जिल्ह्यातील खुदागंज पोलीस स्टेशन हद्दीतील रसुली बिघा गावात एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच आढळलं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. मृताचे नाव राम प्रसाद बिंद असं होतं. तो जहानाबाद जिल्ह्यातील शकुराबाद पोलीस स्टेशन परिसरातील मीरगंज या ठिकाणी राहत होतो. 

मृताच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, राम प्रसाद बिंद याने आत्महत्या केली नाही तर हा पूर्वनियोजित खून आहे. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, राम प्रसादची हत्या त्याची पत्नी, मेहुणी आणि त्याच गावातील एका ऑटो चालकाने केली आहे. जो दोन्ही बहिणींचा प्रियकर होता असं त्यांनी सांगितलं. यातून अवैध संबंधातून रक्तरंजित खेळ समोर आला आहे. इथे दोन बहिणी एका ऑटो ड्रायव्हरवर प्रेम करत होत्या. एका बहिणीच्या लग्नानंतरही ऑटोचालकासोबतचे प्रेम कायम राहिले. पती लुधियाना येथील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होता. पत्नी आणि मेहुणीने मिळून त्याला बोलावले आणि त्याच्या ऑटो ड्रायव्हर प्रियकरासह त्याची हत्या केली.

कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, पत्नीने त्याला आमिष दाखवून रसूली बिघा गावात तिच्या सासरच्या घरी बोलावले होते. जिथे त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. मृताच्या भावाने सांगितले की, त्याचा भाऊ लुधियाना इथे एका खाजगी कारखान्यात काम करत होता आणि तो सुमारे 10 दिवसांपूर्वी रजेवर त्याच्या गावी आला होता.

दरम्यान, त्याच्या पत्नीने तिच्या पालकांच्या घरी येण्याचा आग्रह धरला आणि राम प्रसाद तिथे गेला. जेव्हा त्याला त्याची पत्नी आणि मेहुणी यांच्यातील अवैध संबंधांबद्दल कळले तेव्हा त्याने त्याचा निषेध केला, ज्यामुळे तिघांनी संताप व्यक्त केला आणि कट रचून त्याची हत्या केली. मात्र, त्या तरुणाने गळफास घेतल्याची चर्चा गावात आहे. मृताच्या पत्नीला कळवल्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याचा मृतदेह त्यांच्यासोबत नेला.

खुदागंज पोलीस स्टेशनचे प्रभारी जेपी नारायण यांनी सांगितले की, मृताच्या कुटुंबीयांनी जहानाबाद जिल्ह्यातील शकुराबाद पोलीस स्टेशनमध्ये अर्ज सादर करून हत्येचा संशय व्यक्त केला आहे. शकुरबाद पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

Read More