Marathi News> भारत
Advertisement

राजस्थानमध्ये 23 मोरांचा संशयास्पद मृत्यू

23 मोरांचा संशयास्पद मृत्यू

राजस्थानमध्ये 23 मोरांचा संशयास्पद मृत्यू

जयपूर : राजस्थानच्या बांसवाडा जिल्हायात 23 मोरांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तलवाडा पोलीस चौकीच्या हद्दीतील नाथूखेडी गावात 23 मोरांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचून वन विभागाला याबाबत सूचना दिल्या. 

fallbacks

वन विभागाच्या मदतीने मोर यांचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी त्यांना बाडमेरच्या पशु रुग्णालयात पाठवण्यात आलं. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 नर मोर आणि 13 मादी मोरांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लवकरच याबाबत माहिती पुढे येईल.

Read More