Marathi News> भारत
Advertisement

सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढणार; लवकरच तुफान तेजीचे संकेत

किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार सणासुदीच्या दिवसांमध्ये सोने खरेदीत वाढ होणार आहे.

सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढणार; लवकरच तुफान तेजीचे संकेत

मुंबई : पुढील तीन महिन्यात 28 टक्के भारतीय सोन्यावर खर्च करू शकतील असा अंदाज आहे. कोविड 19 ची दुसरी लाट कमी होत असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होऊ शकते. पीटीआयच्या वृत्तानुसार एका सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे की, कोविडचे शिथिल होत जाणारे निर्बंध पाहता रत्न आणि दागिन्यांच्या उद्योगाला पुन्हा झळाळी येण्याची शक्यता आहे. 

मागणी वाढण्याची शक्यता
दुसरी लाट अत्यंत कमी झाल्यानंतर राज्य सरकार हळु हळु निर्बंध शिथिल करीत  आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेते आशा व्यक्त करीत आहेत की, नवरात्र, दसरा, दिवाळीच्या काळात सोन्याची मागणी वाढू शकते. मार्केट रिसर्च फर्म यु गोव्सच्या दिवाळी खर्च इंडेक्स (Diwali Spending Index)च्या मते शहरी भारतीयांमध्ये सणासुदीच्या काळात खर्च करण्याची इच्छा वाढणार आहे. 28 टक्के शहरी भारतीय सोन्यावर खर्च करण्याचा अंदाज आहे.

सर्वेक्षण 
17 ते 20 ऑगस्ट दरम्यान यु गोव बोमनीबसच्या माध्यमातून दिवाळ खर्च इंडेक्सच्या आकड्यांसाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. देशातील विविध भागातील लोकांनी हे सर्वेक्षण ऑनलाईन जमा केले होते. यामध्ये अनेक लोकांनी भौतिक सोने खरेदीकडे कल दर्शवला होता.

Read More