Marathi News> भारत
Advertisement

6 दिवसात भाजपच्या 3 आमदारांचं निधन

भाजपसाठी मागचा आठवडा खूपच वाईट ठरला.

6 दिवसात भाजपच्या 3 आमदारांचं निधन

नवी दिल्ली : भाजपसाठी मागचा आठवडा खूपच वाईट ठरला.

3 आमदारांचं निधन

मागील 6 दिवसात भाजपने पक्षाच्या 3 आमगारांना गमावलं. उत्तराखंडचे भाजप आमदार मगनलाल शाह यांचं वयाच्या 55 व्या वर्षी निधन झालं. मोली जिल्ह्यातील थराली विधानसभा मतदारासंघातून ते निवडून आले होते. रविवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

उपचारादरम्यान मृत्यू

चमोलीच्या जवळ जौलीग्रांटमध्ये हिमालयन रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. श्वास घेण्यात त्रास, फुप्फुसात संक्रमण आणि न्यूमोनिया यामुळे त्यांना 19 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अनलकी आठवडा

याआधी 21 फेब्रुवारीला यूपीच्या बिजनौरमधील नुरपूरमधून आमदार लोकेंद्र सिंह यांचा एका अपघातात मृत्यू झाला होता. तर राजस्थानच्या नाथदेवडामधून आमदार कल्याण सिंह यांचा अमेरिकेत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Read More