Marathi News> भारत
Advertisement

बाबांची लाडकी लेक म्हणतेय 'दिल है छोटासा'....

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

बाबांची लाडकी लेक म्हणतेय 'दिल है छोटासा'....

मुंबई : लहान मुलांमधील निरागसता ही प्रत्येकालाच भावते. त्यांच्यातील खोडकरापणा देखील हवाहवासा वाटतो. त्यांच्यातील निरागसता कॅमेऱ्यात कैद करण्याचे प्रयत्न सगळ्यांचे असतात. असात कॅमेऱ्यात कैद केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

2 फेब्रुवारी रोजी 3 वर्षांच्या वेदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत वेदा आपल्या वडिलांच्या गाण्याच्या कार्यक्रमात गाताना दिसत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, माधव बिना अग्रवाल यांनी 'रोझा' सिनेमातील 'दिल है छोटासा' हे गाणं गाण्यासाठी आले. तेव्हाच त्यांची मुलगी वेदा स्टेजवर आली. आणि तिने एकटीने गाणं गाण्याची इच्छा व्यक्त केली. 

या व्हिडिओत वेदा स्वतः हे गाणं गाताना दिसतेय. एवढंच नव्हे तर या गाण्यावर छान परफॉर्म करताना देखील दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियार प्रचंड व्हायरल झाला आहे.

Read More