Marathi News> भारत
Advertisement

Psycho Shankar : एक ट्रक ड्रायव्हर, 30 बलात्कार अन् 19 हत्या; महिला हवालदारालाही सोडलं नाही!

Crime Story: एम जयशंकर या आरोपीने 30 महिलांवर बलात्कार केले. इतकंच नव्हे तर 15 जणांचा जीव घेतला. वाचा ही थरारक कहाणी 

Psycho Shankar : एक ट्रक ड्रायव्हर, 30 बलात्कार अन् 19 हत्या; महिला हवालदारालाही सोडलं नाही!

Crime Story: दररोज गुन्हेगारीच्या घटना कुठे ना कुठे घडत असतातच. मात्र काही गुन्हे असे असतात जे आपल्याला मुळापासून हादरून ठेवतात. अशाच एका सायको किलरच्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल आज आपण माहिती करुन घेणार आहोत. या सायको किलरमुळं संपूर्ण दक्षिण भारतात दहशत पसरली होती. या किलरचे टार्गेट फक्त आणि फक्त महिलाच होते. सुरुवाताली आरोपी महिलांवर बलात्कार करायचा नंतर त्यांना इतकी क्रूर वागणूक द्यायचा की ऐकतानाही अंगावर शहारा येईल. कोण आहे का सायको किलर आणि तो कसा पकडला गेला, जाणून घेऊया संपूर्ण माहिती. 

एम. जयशंकर म्हणजेच सायको शंकर असं या आरोपीचे नाव आहे. असं म्हणतात की या आरोपीने एक दोन नव्हे तर 30 बलात्काराचे गुन्हे केले आहेत आणि 19 महिलांची हत्या केली आहे. 4 वर्षांपर्यंत तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये भयावह उन्माद माजवला होता. महिलांवर बलात्कार केल्यानंतर त्यांना टॉर्चर करुन मारण्यात मजा येते, असं आरोपीने म्हटलं होतं. आरोपी हा ट्रक चालक म्हणून काम करत होता. त्याला तीन मुलीदेखील आहेत. 

तामिळनाडूच्या सालेम येथे राहणारा कुख्यात गुन्हेगार जयशंकरने पहिला गुन्हा केला तो 2008मध्ये. तर, गुन्हाच्या नोंद झाली ती 3 जुलै 2009मध्ये तेव्हा त्याने पेरंदहल्लीमध्ये 45 वर्षांच्या एका महिलेवर बलात्कार केला आणि हत्येचा प्रय़त्न केला. ऑगस्ट 2009मध्ये त्याने 12 महिलांवर बलात्कार आणि हत्या केली होती. तर, अन्य सहा महिलांवर बलात्कार केला होता. 

जयशंकर नेहमी त्याच्यासोबत एक काळ्या रंगाची हँडबॅग घेऊन फिरत असायचा त्यात एक चाकूदेखील तो ठेवायचा. त्याला कोणी विरोध करताच तो त्याच चाकूने त्याचा जीव घ्यायचा. तो हायवेजवळ असलेल्या ढाब्यावर वेश्यांचे अपहरण करायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांची हत्या करायचा. त्यानंतर त्याने ग्रामीण भागात शेतात काम करणाऱ्या महिलांना निशाणा केले. 

23 ऑगस्ट 2009मध्ये जयशंकर याने 39 वर्षांच्या महिला पोलीस कॉन्सटेबलवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. ही महिला कॉन्सटेबल उपमुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांच्या दौऱ्यादरम्यान ड्युटीवर आली होती. जयशंकरने आधी तिचे अपहरण केले नंतर वारंवार तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांना जवळपास एक महिन्यानंतर म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह सापडला. 

तिरुप्पर पोलिसांनी जयशंकरला अटक करण्यासाठी विशेष मोहिम राबवली होती. 19 ऑक्टोबर 2009 मध्ये त्याला अटक करण्यात आले. त्याच्यावर 13 वेगवेगळ्या गुन्ह्यांवर आरोप लावण्यात आले होते. जयशंकरला कोईंबतूर मध्यवर्ती जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच्यावर फास्टट्रॅक कोर्टात खटलाही चालवण्यात आला. ज्यादिवशी कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर त्याला पोलिस कोठडीत नेण्यात येत होते तेव्हाच तो तिथून पसार झाला. 

जयशंकर कर्नाटकात पळून आला. तिथे त्याने एक महिन्याच्या आतच बेल्लारीमध्ये सहा महिलांवर बलात्कार केला आणि त्यांची हत्या केली. त्याने धर्मपुरीमध्ये एक व्यक्ती आणि एक मुलाचादेखील खून केला. 4 मे 2011मध्ये कर्नाटकात एका गावातील महिलावर बलात्कार करण्याचा प्रयत्नात तो पकडला गेला. गावकऱ्यांनी त्याला पोलिसांत दिले. 

2011ला त्याला अटक करण्यात आल्यानंतर बेंगळुरातील जेलमध्ये त्याला ठेवण्यात आले. त्याला 27 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तिथे त्याच्या मानसिक आरोग्यावर उपचारदेखील सुरू होते. मात्र, पुन्हा एकदा 2013मध्ये तो जेलमधून निसटला. पुन्हा एकदा त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी रेड अलर्ट जारी केला. त्याला पकडून देणाऱ्या व्यक्तीला 500,000 च्या बक्षीसाची घोषणा केली. त्याचा फोटोचे पोस्टर पाच भाषेत लावण्यात आले. हिंदी, कन्नड, मराठी, तामिळ आणि तेलगुमध्ये छापण्यात आले. महाराष्ट्रातही याविषयी अलर्ट देण्यात आला. 

पोलिसांनी जयशंकरला 6 सप्टेंबर 2013 ला अटक केली. 25 फेब्रुवारी 2018 रोजी त्याने पुन्हा एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला प्रशासनाने एकांत कारावासात ठेवले. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी त्याने एका शेव्हिंग ब्लेडने गळ्यावर वार करत आत्महत्या केली. अशाप्रकारे एका कुख्यात रेपिस्ट आणि गुन्हेगाराचा शेवट झाला. 

Read More