Marathi News> भारत
Advertisement

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४ जवान शहीद, २ जखमी

नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत ४ भारतीय जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४ जवान शहीद, २ जखमी

रायपूर : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये झालेल्या नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत ४ भारतीय जवान शहीद झाले आहेत. तर २ जवान जखमी झाले आहेत. राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवार माहिती दिली की, परतापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत नक्षलवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत बीएसएफचे ४ जवान शहीद झाले आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, महला गावाजवळ जवान गस्त घालत असताना त्यांच्यावर अचानक नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर जवानांनी देखील त्यांनी प्रत्यूत्तर दिलं.

काही वेळ चकमक चालल्यानंतर नक्षलवादी तेथून फरार झाले. जवानांकडून नक्षलवाद्यांचा शोध सुरु आहे. कांकेरमध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

Read More