Marathi News> भारत
Advertisement

उपचाराच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलेचं 5 वर्ष यौन शोषण

 गुंगीचं औषध देऊन यौन शोषण 

उपचाराच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलेचं 5 वर्ष यौन शोषण

लखनऊ : डॉक्टरांना तसं तर देवच म्हटलं जातं. पण काही डॉक्टर असे असतात ज्यांच्या कृत्यामुळे इतर चांगल्या डॉक्टरांचं देखील नाव खराब होतं. लखनऊमध्ये डॉक्टर या पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. डॉक्टरवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. 

महिलेने आरोप केला आहे की, ज्या डॉक्टरकडे ती उपचार घेण्यासाठी जात होती तो गुंगीचं औषध देऊन तिचं यौन शोषण करायचा. आरोपी डॉक्टर मागील 5 वर्षापासून उपचाराच्या नावाखाली तिचं यौन शोषण करत आहे. यानंतर तो तिचा फोटो देखील काढत असे. या फोटोच्या माध्यमातून डॉक्टर त्य़ा महिलेला ब्लॅकमेल करत होता. या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहे.

Read More