Marathi News> भारत
Advertisement

मुलाच्या मित्राशीच केलं लग्न; 50 वर्षीय महिला गरोदर राहिल्यानंतर म्हणाले, 'मला काही...'

Trending News In Marathi: 50 वर्षांच्या महिलेने तिच्याच मुलाच्या मित्रासोबत लग्न केले. इतकंच नव्हे तर आता ती गरोदरदेखील आहे.

मुलाच्या मित्राशीच केलं लग्न; 50 वर्षीय महिला गरोदर राहिल्यानंतर म्हणाले, 'मला काही...'

Trending News In Marathi: आजकाल नात्यांची परिभाषा बदलताना दिसतेय. अशीच एक खळबळजनक घटना समोर आलीये चीनमध्ये. येथे एका 50 वर्षांच्या महिलेने तिच्याच मुलाच्या मित्रासोबत लग्न केले. इतकंच नव्हे तर आता ती आईदेखील बनणार आहे. सोशल मीडियावर या लव्ह स्टोरीने चांगलाच गदारोळ माजला आहे. या महिलेचे नाव सिस्टर शेन असं असून ती गुआंगझोउ येथे राहते. तर ई-कॉमर्सचा तिचा बिझनेस सांभाळते. 

मिळालेल्या माहितीनुसार, सिस्टर शिनने वयाच्या 30व्या वर्षी तिच्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर मुलाची व मुलीचे संगोपन एकटीने केले होते. मात्र आता तिच्या आयुष्यात एक वेगळे वळण घेतले आहे. तिच्या मुलाने एक न्यू इअर डिनर पार्टीसाठी तिन मित्रांना घरी बोलवले होते. यातील एक डेफू नावाचा व्यक्तीदेखील आला होता. तो रशिया येथील होता. डेफू कायकायपेक्षा (सिस्टर शिनच्या मुलगा) एक वर्ष मोठा होता. डेफू अनेक वर्ष चीनमध्ये राहत होता आणि छान चीनी भाषा बोलत होता. डिनर पार्टीदरम्यान सिस्टर शिन यांनी बनवलेले जेवण आणि त्यांचा स्वभाव यावर भाळून डेफू याने त्याची एक दिवसांची ट्रिप वाढवून एक आठवड्याची केली. 

या दरम्यान डेफू आणि सिस्टर शेन यांच्यातील जवळीक वाढली. डेफूने सिस्टर शिन यांना गिफ्ट पाठवण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांनी त्यांना प्रपोज केले. पहिले तर सिस्टर शिनने त्याला नकार दिला. मात्र नंतर शिन यांच्या मुलानेच त्यांना प्रोत्साहन दिलं तसंच, डेफूचे प्रेम पाहून सिस्टर शिन यांनीदेखील त्याला होकार दिला. त्या दोघांनीही नंतर लग्न केले. आता या जोडप्याची प्रेमकहाणी चर्चेत आहे. 8 जून रोजी सिस्टर शिन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रेग्नेंसीची गुडन्यूज शेअर केली होती. त्यांनी पुढे म्हटलं आहे की, वाढते वय असल्याने प्रेग्नेंसी रिस्की असली तरी डेफूसोबत असल्याने हा अनुभव अधिक खास आहे. 

सिस्टर शेन आणि डेफूची प्रेम कहाणी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. काही जणांनी त्यांना सलाम केले आहे तर काहींनी हा भलताच प्रकार असून दोघांनाही खडे बोल सुनावले आहेत. मात्र सिस्टर शिन आणि डेफू दोघांनाही या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही. त्यांच्यासाठी प्रेमच सर्वकाही आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

Read More