Marathi News> भारत
Advertisement

आता 6 कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार, असं तपासा तुमचं PF Balance

 ईपीएफओने ग्राहकांनी पोस्ट केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

आता 6 कोटी लोकांच्या खात्यात पैसे जमा करणार सरकार, असं तपासा तुमचं PF Balance

मुंबई : कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच, सुमारे 6 कोटी ग्राहकांच्या खात्यात कर्मचारी भविष्य निधी (EPF) व्याज जमा करणार आहे. ईपीएफओने एका ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. ईपीएफओने ग्राहकांनी पोस्ट केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, व्याज जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे आणि लवकरच ती त्यांच्या खात्यात जमा होईल.

ईपीएफओने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'जेव्हा ही व्याज जमा केले जाईल तेव्हा ते पूर्ण दिले जाईल. व्याजाचे नुकसान होणार नाही. कृपया धीर धरा.' ईपीएफओ लवकरच पगारदारांच्या खात्यात 8.5 टक्के ईपीएफ व्याज जमा करू शकतो. रिटायरमेंट फंड रेगुलेटरी बॉडीने आर्थिक वर्ष 2020-21 साठी EPF व्याजदर अपरिवर्तित ठेवले.

7 वर्षातील सर्वात कमी व्याज दर

2020 मध्ये कोविड -19 च्या प्रकरणानंतर, ईपीएफओने मार्च 2020 मध्ये पीएफ व्याज दर 8.05 टक्के केला. हा गेल्या 7 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये व्याजदर 8.65 टक्के होता. मात्र, 2017-18 या आर्थिक वर्षात ते केवळ 8.55 टक्के होते.

परंतु ग्राहकांना हा प्रश्न पडतो की, त्यांनी हे व्याजदर किंवा खात्यात जमा रक्कम कशी तपासावी? तर आज आम्ही तुम्हाला ती घरच्या घरी अगदी 5 मिनिटांत कशी चेक करायची हे सांगणार आहोत. ईपीएफ शिल्लक आणि व्याज स्थिती ही तुम्ही चार प्रकारे तपासू शकतात.

ईपीएफ शिल्लक तपासण्यासाठी ग्राहकांनी त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) सक्रिय असणे आवश्यक आहे.

SMSद्वारे PF Balance तपासा

ईपीएफओचे सदस्य SMS पाठवून त्यांचे ईपीएफ खाते शिल्लक तपासू शकतात. यासाठी त्यांना 7738299899 या क्रमांकावर संदेश पाठवावा लागेल. त्यांना “EPFOHO UAN ENG”  लिहून आणि दिलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवा SMS पाठवावा लागेल. त्यानंतर ईपीएफओ SMS मिळाल्यावर तुम्हाला परत पीएफ खात्यातील शिल्लक तपशील पाठवेल

मिस्ड कॉलद्वारे PF Balance तपासा

EPFO ने शिल्लक तपासण्यासाठी मिस्ड कॉलची सुविधा देखील दिली आहे. अशा स्थितीत तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन PF Balance तपासू शकता. परंतु यासाठी, ईपीएफओ ग्राहकांची संख्या पीएफ खात्यात नोंदणीकृत असावी. याशिवाय, ईपीएफओ सदस्याला UAN, KYC तपशीलात जोडले जावे.

PF Balance पोर्टलद्वारे तपासा

ईपीएफओ सबस्क्राइबर्स पोर्टलवर स्वतःची नोंदणी केल्यानंतर, UAN आणि पासवर्ड वापरून https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login# वर लॉग इन करा. याद्वारे तुम्ही तुमचे पासबुक पाहू शकता.

UMANG अ‍ॅप वरूनही PF Balance चेक करता येतो

ईपीएफओ सदस्य त्यांचे PF Balance आणि ईपीएफ स्टेटमेंट 'UMANG ' मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे पाहू शकतात. यासाठी कर्मचारी केंद्रित सेवांवर जा आणि पासबुकवर क्लिक करा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये तुमची शिल्लक तपासण्यासाठी तुम्हाला UAN टाकावा लागेल आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला तुमचा OTP टाकावा लागेल. ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या PF Balance बद्दल योग्य माहिती मिळेल.

Read More