Marathi News> भारत
Advertisement

समुद्रमार्गे भारतात सहा दहशतवादी घुसल्याची माहिती, हायअलर्ट जारी

चेन्नईच्या पोलीस आयुक्तांनी शहरात अतिसतर्कतेचे आदेश दिले आहे

समुद्रमार्गे भारतात सहा दहशतवादी घुसल्याची माहिती, हायअलर्ट जारी

चेन्नई : दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये समुद्रमार्गाने सहा दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती मिळतेय. चेन्नईमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. हे सहा संशियत दहशतवादी समुद्रमार्गे उत्तर श्रीलंकेतून रामेश्वरमार्गाने कोईम्बतूरमध्ये घुसले आहेत. या सहा दशतवाद्यांपैकी एक इलियास अन्वर हा पाकिस्तानचा नागरिक असून इतर पाच जण श्रीलंकेन तमिळ आहेत.

चेन्नईच्या पोलीस आयुक्तांनी शहरात अतिसतर्कतेचे आदेश दिले आहे. कोईम्बतूरमधील महत्त्वाच्या चौदा रस्त्यांवर नाकाबंदी करत सुरक्षितता वाढवण्यात आलीय. संपूर्ण शहरात दोन हजार पोलीस गणवेशात आणि साध्या वेशात तैनात आहेत. 

यामुळे कोइम्बतूरला जाणारे राज्यातील १४ प्रमुख रस्ते मार्गांवर सुरक्षा एजन्सी लक्ष ठेवून आहेत. ही गुप्त माहिती हाती आल्यानंतर २००० हून अधिक पोलीस ठिकठिकाणी तैनात आहेत.  

Read More