Marathi News> भारत
Advertisement

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेत 6238 जागांवर भरती, किती असेल पगार आणि अर्ज कसा कराल, सविस्तर जाणून घ्या


RRB Technician Recruitment 2025: एकूण 6238 पदांवर भरती पक्रिया सुरू होणार आहे. अर्ज कसा भरायचा आणि किती पगार मिळेल, हे जाणून घ्या.   

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेत 6238 जागांवर भरती, किती असेल पगार आणि अर्ज कसा कराल, सविस्तर जाणून घ्या

RRB Technician Recruitment 2025: तुम्ही पण सरकारी नोकरीच्या संधीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना रेल्वेत नोकरीची संधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) ने RRB Technician Recruitment 2025 अंतर्गंत एक अधिसूचना जारी केली आहे. या भरती अभियानांतर्गंत एकूण 6238 टेक्निशियन पदांसाठी जागा रिकाम्या आहेत. यात टेक्नीशियन ग्रेड-I (सिग्नल) साठी 183 पदांवर टेक्नीशियन ग्रेड III पदांसाठी 6055 पदांवर भरती होणार आहे. 

RRB Technician Recruitment 2025: केव्हापर्यंत करू शकता अर्ज

RRB Technician Recruitment 2025 भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 28 जून 2025 पासून सुरू होणार आहे. उमेदवार 28 जुलै 2025 पर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज भरू शकतात. अर्जाचे शुल्क 30 जुलै 2025पर्यंत ठरवण्यात येईल. पण अर्जदारांनी लवकरात लवकर अर्ज करावा, असं अवाहन करण्यात येत आहे. तुमचा अर्जातील चूका दुरुस्त करण्यासाठी 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2025पर्यंत सुरू राहणार आहे. 

RRB Technician Recruitment 2025: अर्जाचे शुल्क किती असेल?

अर्जाच्या शुल्काबाबत बोलायचे झाल्यास SC, ST, PwD, महिला, तृतीयपंथी, ईडब्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी 250 रुपये तर अन्य श्रेणींसाठी 500 रुपये भरावे लागणार आहेत. CBT परीक्षेत सहभागी झाल्यानंतर अन्य काही श्रेणींना अंशतः रिफंडदेखील मिळणार आहे. 

RRB Technician Recruitment 2025: किती मिळणार पगार

पगाराबाबत बोलायचे झाल्यास टेक्निशियन ग्रेड Iसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दर महिना 29,200 तर टेक्निशयन ग्रेड III साठी निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 इतके मासिक वेतन असणार आहे. हे वेतन सरकारच्या निर्धारित सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे. ज्यात महगाई भत्ता, एचआरए, प्रवासी भत्ता मिळणार आहे. 

RRB Technician Recruitment 2025: निवड प्रक्रिया

निवड प्रक्रियेतदेखील तीन टप्पे असणार आहेत. पहिला कंम्यूटरआधारित टेस्ट (CBT), त्यानंतर दस्तावेज व्हेरिफिकेशन आणि शेवटी फिटनेस टेस्ट. फायनल मेरिट लिस्ट फक्त CBT मधील निकाल आणि दस्तावेजाच्या आधारे केली जाईल. 

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रथम indianrailways.gov.in ला भेट द्यावी आणि RRB RRB Technician Recruitment 2025 च्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर तुमचे नाव, ईमेल, फोन नंबर, शैक्षणिक तपशील आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला अर्ज शुल्क भरावे लागेल आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतील. शेवटच्या टप्प्यात, फॉर्म सबमिट करणे आणि त्याचे प्रिंटआउट सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

Read More