Love Story : प्रेमात ना वय पाहिलं जातं ना रंग, प्रेम कुठल्या वयात कुठल्याही क्षणी होऊ शकतं. गेल्या काही वर्षांमध्ये प्रेमाचे अनेक विचित्र प्रेम कहाणी किंवा घटना पाहिल्या आहेत की आपल्याला धक्काच बसतो. अलिगढचे सासू जावयाचं प्रेम, काका आणि भाची, मामी आणि भाचा अशा प्रेम प्रकरणामुळे समाजात प्रेमाची विचित्र घटनांमध्ये अनेकांना धक्का बसलाय. अलीगढमधील सासू जावयाची बहुचर्चित प्रेम कहाणी चर्चेत असताना राजस्थानामधील बिकानेर जिल्ह्यातील अशीच एक धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आलं आहे.
65 वर्षांचा प्रियकर, 19 वर्षांची प्रेयसी, हो अगदी बरोबर वाचलं तुम्ही या प्रकरणामुळे सर्वांना धक्का बसलाय. हे प्रकरण समोर तेव्हा आलं जेव्हा या दोघांनी बुधवार, 16 एप्रिल रोजी आत्महत्या केली. हे धक्कादायक प्रेमप्रकरण बिकानेर जिल्ह्यातील नोखा शहरातील आहे. नोखा येथील गट्टाणी शाळेच्या मागे 65 वर्षीय नारायण राम जाट राहत होते. मुलगा दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर राहतो आणि नारायण राम तळमजल्यावर राहत होते. बुधवारी दुपारी मुलगा वरच्या मजल्यावरून खाली आला आणि त्याने वडिलांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण दरवाजा आतून बंद होता. वारंवार जोरात दार वाजवूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मुलाला काहीतरी अनुचित असल्याचा संशय आला. त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला आणि आत डोकावून पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. वडील फाशीला लटकत होते त्यासोबत एका मुलीचाही मृतदेह फासावर लटकलेला आढळला. शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांनाही ताबडतोब खाली आणून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत नारायण राम यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा नोखा इथे राहतो तर धाकटा मुलगा बंगळुरू येथे राहतो आणि काम करतो. नारायण रामची पत्नी तिच्या धाकट्या मुलासह बंगळुरूमध्ये राहते. नारायण राम त्यांच्या घराच्या तळमजल्यावर एकटे राहत होते आणि त्यांचा मोठा मुलगा वरच्या मजल्यावर राहत होता. नोखा पोलीस स्टेशनचे प्रभारी अमित स्वामी यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी वरच्या मजल्यावर राहणारा नारायण राम यांचा मुलगा खाली आला आणि त्याने त्याच्या वडिलांना हाक मारली. वारंवार हाक मारूनही काहीच हालचाल झाली नाही तेव्हा मुलाला काहीतरी अनुचित घडल्याची भीती वाटली. त्यानंतर शेजाऱ्यांना बोलावण्यात आले. दरवाजा तोडल्यानंतर वृद्ध वडील आणि एका मुलीचे मृतदेह फासावर लटकलेले आढळले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमलाही पाचारण करण्यात आले. पोस्टमॉर्टेमनंतर दोन्ही मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्या खोलीत वृद्ध नारायण राम आणि मुलीने आत्महत्या केली. त्याच खोलीत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या सुसाईड नोटबद्दल कोणालाही माहिती दिलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या सुसाईड नोटमध्ये त्या दोघांनी संपूर्ण प्रेमकहाणी लिहिलेली आहे. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्यानंतर लोक थक्क झाले. मात्र, आतापर्यंत हे माहित नाही की दोघांमध्ये प्रेमसंबंध किती काळापासून सुरू होते.