Marathi News> भारत
Advertisement

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA मध्ये 5 टक्के वाढ निश्चित, जाणून घ्या किती वाढणार पगार

 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे.  

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA मध्ये 5 टक्के वाढ निश्चित, जाणून घ्या किती वाढणार पगार

नवी दिल्ली : 7th Pay Commission: केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता 1 जुलैपासून वाढण्यास येत आहे. एआईसीपीआई कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता थेट 39 टक्के होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे, ज्याची ते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून वाढणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 1 जुलैपासून महागाई भत्त्यात (डीए हाइक) 5 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार हे जाणून घेऊया. 

महागाई भत्ता वाढणार!

वास्तविक, DA मधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे. मार्च 2022 मध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाली होती, त्यानंतर हे निश्चित आहे की सरकार महागाई भत्ता (DA) 3 नव्हे तर 5 टक्के वाढवू शकते. याला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरुन 39 टक्के होईल. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 27 हजारांहून अधिक वाढ होऊ शकते.
 
यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एआयसीपीआय निर्देशांकात घसरण झाली होती, मात्र त्यानंतर एआयसीपीआयचे आकडे वाढत आहेत. जानेवारीमध्ये 125.1, फेब्रुवारीमध्ये 125 आणि मार्चमध्ये एक पॉइंट वाढून 126 झाला. आता एप्रिल महिन्याचीही आकडेवारी समोर आली आहे. एप्रिलच्या आकडेवारीनुसार, AICPI निर्देशांक 127.7 वर आला आहे. यामध्ये 1.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे, म्हणजेच आता मे आणि जूनची आकडेवारी 127 च्या पुढे गेल्यास 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

पगार किती वाढणार?

सरकारने डीएमध्ये 5 टक्के वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्के होईल. आता जास्तीत जास्त आणि किमान मूळ वेतनात किती वाढ होईल ते पाहू. 

कमाल मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍यांचा मूळ पगार  56,900  रुपये
2. नवीन महागाई भत्ता (39%)  22,191  रुपये/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (34%)   19,346  रुपये /महिना
4. किती महागाई भत्ता 21,622 ने वाढला- 19,346 =  2,845  रुपये/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2,845X12 = 34,140 रुपये

किमान मूळ वेतनावरील गणना

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 18,000 रुपये 
2. नवीन महागाई भत्ता (39%) 7,020  रुपये/महिना
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (34%) रुपये 6120/महिना
4. महागाई भत्ता किती वाढला 7020-6120 =  900  रुपये/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 900 X12 =  10,800  रुपये

Read More