Marathi News> भारत
Advertisement

Mass Wedding: 'या' गावात एकाचवेळी 400 जोडपी अडकली लग्नबंधनात; प्रत्येक कपलला मिळालं इतकं सोनं

Mass Wedding At Tamil Nadu: मागील अनेक वर्षांपासून अशापद्धतीच्या सामूहिक विवाहसोहळ्याचं आयोजन केलं जात असून दरवर्षी येथे शेकडोच्या संख्येनं जोडपी लग्नबंधनात अडकतात.

Mass Wedding: 'या' गावात एकाचवेळी 400 जोडपी अडकली लग्नबंधनात; प्रत्येक कपलला मिळालं इतकं सोनं

Tamil Nadu Mass Wedding: तामिळनाडू (Tamil Nadu) आणि केरळच्या (Kerala) सीमेवर असलेल्या आर्थिक दृष्ट्या मागास गावामध्ये रविवारी सुन्नी युवजन संघम (Sunni Yuvajana Sangham) हा अनोखा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये सामूहिक विवाह लावून देण्यात आले आहेत. गुडलूरजवळच्या पडनथोराईमधील पदनथारा मरकज जवळच्या परिसरामध्ये हा सामूहिक विवाहसोहळा (mass wedding) आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 800 हून अधिक तरुण-तरुणी लग्नबंधनात अडकले. तामिळनाडू-केरळच्या सीमेवरील या छोट्याच्या गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये सांप्रदायिक सौदार्याचं (communal harmony) ​अनोखं उदाहरण पहायला मिळालं. या सोहळ्यामध्ये लग्नबंधनात अडकलेल्या एकूण 400 जोडप्यांपैकी 74 जोडपी ही बिगरमुस्लीम होती. या समुहिक विवाहसोहळ्यामध्ये हिंदू आणि ख्रिश्चन जोडप्यांनीही लग्न केली.

74 जोडपी बिगरमुस्लीम

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या सामूहिक विवाह सोगळ्यामध्ये मौलवींनी निकाह लावून दिले. तर इतर धर्मांमधील 74 जोडप्यांची लग्न शेजारच्या मुथुमरियम्मन मंदिरामध्ये आणि जवळच्याच चर्चमध्ये लावण्यात आली. लग्नानंतर सर्व जोडपी पदंथरा मरकजच्या मैदानामध्ये एकत्र आली. समोरचं हे दृष्य पाहून लग्न केलेल्या जोडप्यांबरोबरच या अनोख्या सोगळ्याला उफस्थिती लावलेल्या नातेवाईकांनाही आश्रू अनावर झाले.

प्रत्येक जोडप्याला दिलं इतकं सोनं

देवरशोला अब्दुस्सलाम मुस्लियार या संस्थेच्या वतीने आर्थिक दृष्ट्या मागास गावामध्ये पाचव्यांदा अशाप्रकारचा सोहळा आयोजित करण्यात आला. या सर्व सोहळ्याचा खर्च संस्थेच्या माध्यमातून केला जातो. गोळा केलेल्या निधीमधून ही लग्न लावली जातात. या विवाहसोहळ्यात लग्नबंधनात अडकेलेल्या जोडप्यांना लग्नासाठीची कपडे आणि अन्य गोष्टींच्या खर्चाबरोबरच 5 तोळे सोनंही देण्यात आलं. अनेकांनी हा सोहळा आयोजित करण्यासाठी आर्थिक मदत केली. 

आतापर्यंत 1500+ जोडप्यांनी घेतला लाभ

डॉ. अब्दुस्सलाम मुस्लियार यांनी 2014 मध्ये पडनथोराई आणि त्याच्या आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या तरुणांची दुर्दशा पाहून हा सामूहिक विवाहसोहळ्याचा सामाजिक प्रयोग सुरु केला. तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी होणाऱ्या या सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून 1,520 गरीब जोडप्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली आहे.

Read More