Marathi News> भारत
Advertisement

भर रस्त्यात ट्रक चालकाशी पंगा घेणं तरुणाला पडलं महागात; पाहा Video

Viral Video : तुम्ही कधी कुठे फिरण्यासाठी गेलं असता एखाद्या ट्रक चालकाशी (Truck Driver)  साधलाय का? 

भर रस्त्यात ट्रक चालकाशी पंगा घेणं तरुणाला पडलं महागात; पाहा Video

Viral Video : तुम्ही कधी कुठे फिरण्यासाठी गेलं असता एखाद्या ट्रक चालकाशी (Truck Driver)  साधलाय का? ही मंडळी देशभरात विविध राज्यांमधून सामानाची ने-आण करत असतात. रस्तेमार्गानं राज्य बदलत असतात. मोठा प्रवास करत असता. ट्रक चालकांचं आयुष्य आणि त्यांचं विश्वच वेगळं. पण, या साऱ्यामध्येही घरापासून दूर, कामात व्यग्र असतानाही ही मंडळी जगण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिला का? (Social Media Viral Video) 

नुकताच सोशल मीडियावर (instagram Video) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण त्याच्या कारमध्ये बसल्याचं दिसत आहे. तर, त्याच्या शेजारी एक ट्रक उभा असल्याचं दिसत आहे. 

हेसुद्धा वाचा : हा माझा अखेरचा जन्म... सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणत राजबिंडा तरुण संन्यस्त मार्गावर

 

प्रथमदर्शनी पाहिलं असता सदर वाहनं एका सिग्नलवर थांबल्याचं कळत आहे. तिथेच कारमध्ये असणारा तरुण अचानच हॉर्न वाजवण्यास सुरुवात करतो. त्याला उत्तर देत हा ट्रक चालकसुद्धा त्याच्याच अंदाजात हॉर्न वाजवतो. मग काय, सिग्नलवर अवघ्या काही सेकंदांमध्ये कारमध्ये असणारा तरुण आणि ट्रक चालक यांच्यामध्ये चक्क हॉर्न  वाजवण्याची जुगलबंदी झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raisway Ram (@at__raisway1)

राहिला प्रश्न या आगळ्यावेगळ्या जुलबंदीमध्ये कोण जिंकतं याचा, तर त्यामध्ये अर्थातच जिंकतो तो म्हणजे ट्रक चालक. कारण, तो एका क्षणाला संपूर्ण गाणंच हॉर्नवर वाजवू लागतो. हे पाहून कारमध्ये असणारा तरुण आणि त्याच्यासोबत असणारी मंडळीही हैराण होतात. 

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहताना अनेकांनाच महामार्गांवरून जाणारे ट्रक चालक आठवले. या व्हिडीओला बरेच लाईक्सही मिळाले आहेत. असं असलं तरीही इथं वाढत्या ध्वनीप्रदुषणाची बाब नाकारता येणार नाही. त्यामुळं तुम्ही असं काही करण्याच्या विचारात असात, तर ते सर्व न करणंच उत्तम. 

Read More