Marathi News> भारत
Advertisement

गुटखा खाऊन घरभर पिचकाऱ्या मारत होती पत्नी, पतीने पोलीस स्टेशन गाठत मांडलं गाऱ्हाणं; पोलीसही हैराण

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक पती पोलीस ठाण्यात पोहोचला असता त्याची तक्रार ऐकून पोलीस कर्मचारी चक्रावले. कारण त्याची तक्रार गुटख्याचं व्यसन असणाऱ्या पत्नीविरोधात होती.   

गुटखा खाऊन घरभर पिचकाऱ्या मारत होती पत्नी, पतीने पोलीस स्टेशन गाठत मांडलं गाऱ्हाणं; पोलीसही हैराण

संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण अनेकदा या भांड्याचा आवाज घराबाहेर पडतो आणि हे क्लेष सर्वांसमोर उघड होतात. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पती-पत्नीमधील असाच एक वाद सध्या चर्चेत आहे. या वादात पतीने पोलीस स्टेशन गाठलं असता पोलीसही त्याचं गाऱ्हाणं ऐकून चक्रावले. याचं कारण पत्नीला गुटख्याचं व्यसन असल्याने पती त्रस्त होता. पत्नी गुटखा खाऊन घरभर थुंकत असल्याचा त्याचा आरोप होता. 

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे माहेराहून सासरी नेत नसल्याने नाराज पत्नी समुदेशन केंद्रात पोहोचली होती. तिने मदतीसाठी आवाज दिला आहे. तिन्ही तारखांमध्ये तडजोड न झाल्याने पतीविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली. हरी पर्वत ठाणे क्षेत्राच्या जीवन मंडी येथे हा सगळा प्रकार घडला आहे. 8 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. 

समुपदेशक डॉक्टर अमित गौड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीचा बुटांचा व्यवसाय आहे. त्याचं म्हणणं आहे की, पत्नी गुटखा खाऊन घरातच थुंकत होती. ती स्वत: दुकानातून गुटखा खरेदी करुन आणत असे. ती कोणालाही आदर देत नव्हती. याचमुळे नाराज होऊन आपण तिला माहेरी पाठवलं होतं. 

दरम्यान पत्नीने आपण गुटख्याचं सेवन करत असल्याचं मान्य केलं आहे. पण आपण सर्वासमोर गुटखा खात नसल्याचं तिचं म्हणणं आहे. तसंच घराच्या स्वच्छतेवर आपण लक्ष घेत असल्याचं तिने सांगितलं आहे. आरोप आहे की, पतीने लग्नाच्या दोन महिन्यातच पत्नीला माहेरी पाठवलं होतं. यानंतर तो कधीच तिला नेण्यासाठी आला नाही. पत्नी गेल्या 6 महिन्यांपासून माहेरी आहे. 

पहिल्या तारखेला दोघांमध्ये तडजोड झाली होती. पत्नीने गुटखा न खाण्याचीही तयारी दर्शवली होती. पण नंतर पुन्हा त्यांच्यात याच मुद्द्यावरुन भांडण झालं होतं. यानंतर तीन तारखा देण्यात आल्या पण दोघांमध्ये तडजोड झाली नाही. 

About the Author

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहे. 2009 मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आपल्या करिअरला सुरुवात केल्यापासून आतापर्यंत मीडियामध्ये 16 वर्षांचा अनुभव घेतला आहे. फोटोकॉर्... Read more

Read More