Marathi News> भारत
Advertisement

Viral Resignation Letter | अजब राजीनामा; नोकरी सोडण्यासाठी फक्त 3 शब्दांचे पत्र

Resignation Letter Viral | सध्या सोशल मीडियावर एक खास राजीनामा पत्र व्हायरल होत आहे. या पत्राची खास गोष्ट म्हणजे यात नोकरीचा राजीनामा देण्यासाठी फक्त 3 शब्द लिहिले आहेत. याबाबत युजर्सने भरपूर कमेंट करत आहेत.

Viral Resignation Letter | अजब राजीनामा; नोकरी सोडण्यासाठी फक्त 3 शब्दांचे पत्र

मुंबई : Resignation Letter Viral on social media | एखाद्याने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला की सर्वप्रथम तो राजनामा पत्र तयार करतो. सहसा, लोक त्यांच्या बॉसचे आभार मानण्यासाठी मोठे पत्र लिहितात. परंतु एका व्यक्तीने राजीनामा पत्रात फक्त 3 अक्षरे कमी केले आहे. आता हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काय लिहलंय पत्रात

एका व्यक्तीने आपल्या बॉसला राजीनामा पत्र लिहताना, "बाय बाय सर" असे फक्त तीन शब्द लिहिले आहेत. या पत्राला आतापर्यंतचे सर्वात छोटे राजीनामा पत्र म्हटले जात आहे. हेच पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सोशल मीडियावर मीम्स 

लोकांनी हे पत्र केवळ सोशल मीडियावर शेअर केले नाही तर ते लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याच्या धडाडीची आणि विनोदाचीही चर्चा केली. त्यानंतर लगेचच ट्विटरवर मीम्सचा महापूर आला. काहींनी तत्सम गोष्टींची आठवण काढायला सुरुवात केली. 

Read More