Marathi News> भारत
Advertisement

'माझी पत्नी आणि तिचं कुटुंब सतत....,' तरुणाने पँटवर सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या; दोन नावं वाचून पोलीसही चक्रावले

तरुणाने केलेल्या आरोपानुसार, दोन कॉन्स्टेबलने त्याला मारहाण केली आणि 50 हजार रुपये मागितले. नंतर त्यांनी 40 हजारांमध्ये तडजोड केली.   

'माझी पत्नी आणि तिचं कुटुंब सतत....,' तरुणाने पँटवर सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या; दोन नावं वाचून पोलीसही चक्रावले

उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्नीच्या नातेवाईकांनी आणि दोन पोलिस कॉन्स्टेबलने मारहाण करून पैसे मागितल्याचा आरोप करत याच कारणास्तव जीव संपवत असल्याचं सांगितलं आहे. आपण निराश आणि संतप्त असल्याचंही त्याने  सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. विशेष म्हणजे त्याने सुसाईड नोट लिहिण्यासाठी पँटचा वापर केला. त्याने पँटवर पेनाने सुसाईड नोट लिहिली. 

सोमवारी, फर्रुखाबादच्या छेडा नागला भागातील एका महिलेने पोलिसांकडे तक्रार केली की तिचा पती दिलीप राजपूतने दारू पिऊन तिला मारहाण केली. सुसाईड नोट आणि पोलीस तक्रारीनुसार, जेव्हा दिलीप त्याच्या वडिलांसह पोलीस स्टेशनला पोहोचला तेव्हा कॉन्स्टेबल यशवंत यादवने त्याला प्रकरण मिटवण्यासाठी 50 हजार रुपये मागितले. दिलीपने नकार दिला असता त्याला मारहाण करण्यात आली.

मारहाणीनंतर दुसरा कॉन्स्टेबल महेश उपाध्याय याने 10 हजार रुपये कमी करत 40 हजारांची मागणी केली. यानंतर दिलीपला सोडून देण्यात आलं होतं. घरी पोहोचल्यावर दिलीपने त्याच्या पँटरव सुसाईड नोट लिहून ठेवली. ज्यामध्ये त्याने पत्नीचे वडील वनवारी लाला, तिचा भाऊ राजू आणि त्याचा मेहुणा रजनीश राजपूत तसंच दोन कॉन्स्टेबल यांच्याकडून होणारा छळ आणि त्यांनी केलेल्या पैशांच्या मागणीचा उल्लेख केला. त्यानंतर त्याने त्याच्या खोलीत गळफास लावून घेतला.

मंगळवारी सकाळी कुटुंबाला दिलीपचा मृतदेह आणि सुसाईड नोट सापडली तेव्हा एकच गोंधळ उडाला. त्यांनी पोलिसांना मृतदेह ताब्यात घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि कॉन्स्टेबलवर कारवाईची मागणी केली.

दिलीप आणि त्याच्या पत्नीमध्ये मंगळवारी भांडण झालं होतं आणि तो त्याच्या पत्नीला तिच्या माहेरी घेऊन गेला होता असं त्याच्या काकांनी सांगितलं आहे. "त्याच्या पत्नीने आणि नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली आणि मारहाण केली. 40 हजार रुपये दिल्यानंतरच त्याला सोडून देण्यात आलं. त्याने त्याच्या पँटवरील सुसाईड नोटमध्ये सर्व काही तपशीलवार लिहिले आहे," असं ते म्हणाले आहेत. 

दिलीपच्या वडिलांनी त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे की, त्याच्या पत्नीच्या कुटुंबाच्या सांगण्यावरून कॉन्स्टेबलने मारहाण केली होती. पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी सांगितलं की, "काल एका पतीने पत्नीला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि पत्नीचे नातेवाईकही पोलिस ठाण्यात पोहोचले. आम्ही दोन्ही बाजूंना तडजोड करण्यास मदत केली. त्या व्यक्तीने घऱी पोहोचल्यानंतर आत्महत्या केली. शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. तक्रारीत, त्या माणसाच्या कुटुंबाने त्याच्या पत्नीच्या तीन नातेवाईकांची आणि दोन कॉन्स्टेबलची नावे घेतली आहेत. एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चौकशी सुरू आहे आणि कठोर कारवाई केली जाईल."

Read More