Marathi News> भारत
Advertisement

...म्हणून सासऱ्याने होणाऱ्या सूनेशीच केलं लग्न; पहिल्या पत्नीपासून आधीच सहा मुलं असतानाही चढला बोहल्यावर

उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने आपल्या होणाऱ्या सूनेशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी आणि मुलाने विरोध केला असता त्याने त्यांना मारहाण केली.   

...म्हणून सासऱ्याने होणाऱ्या सूनेशीच केलं लग्न; पहिल्या पत्नीपासून आधीच सहा मुलं असतानाही चढला बोहल्यावर

उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने आपल्या होणाऱ्या सूनेशीच लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे. मुलाची होणारी बायको घरी आली असता होणारा सासरा तिच्या प्रेमात पडला. त्यांचं हे प्रेमप्रकरण इतक्यावरच थांबलं नाही,तर थेट लग्नापर्यंत गेलं. शकील असं या सासऱ्याचं नाव आहे. शकीलने आधी आपल्या मुलाचं लग्न ठरवलं होतं. नंतर त्यानेच तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर पत्नी आणि मुलाने विरोध केला असता शकीलने विरोध केला. पत्नीने आरोप केला आहे की, त्यानंतर शकीलने फोनवरुन तिच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली होती. 

शकीलला पहिली पत्नी शबानापासून सहा मुलं आहेत. पत्नी शबानाने सांगितलं आहे की, तिला पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला होता. तसंच आपण दोन वेळा रंगेहाथ पडकलं होतं असाही दावा केला आहे. "तो दिवसभर तिला व्हिडीओ कॉल करायचा. सुरुवातीला कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. यानंतर मी आणि माझ्या मुलाने पुरावे गोळा केले," अशी माहिती तिने मीडियाला दिली आहे. 

तिने सांगितलं की, यानंतर माझ्या 15 वर्षीय मुलाने अफेअर असल्याच्या कारणास्तव लग्न करण्यास नकार दिला. मुलाने आरोप केला आहे की, त्याच्या आजी-आजोबांनाही या प्रेमसंबंधाची माहिती होती आणि त्यांनी लग्न होण्यात मदत केली. त्याने सांगितलं आहे की, शकील 2 लाख रोख रुपये आणि 17 ग्रॅम सोनं घरातून केलं लग्न केलं. 

एप्रिलमध्ये, उत्तर प्रदेशातील एक महिला तिच्या जावयासह पळून गेली होती. अलीगढ येथील शिवानीने सांगितलं की, तिची आई अनिता, 3.5 लाख रुपयांहून अधिक आणि ५ लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने घेऊन गेली.

"मी 16 एप्रिल रोजी राहुलशी लग्न करणार होते आणि माझी आई 6 एप्रिल रोजी त्याच्यासोबत पळून गेली. राहुल आणि माझी आई गेल्या तीन ते चार महिन्यांपासून फोनवर खूप बोलत होते," शिवानी म्हणाली. शिवानीचे वडील जितेंद्र कुमार म्हणाले की ते बंगळुरूमध्ये व्यवसाय करतात आणि अनिता तिच्या होणार्‍या जावयाशी तासनतास बोलत असल्याचे ऐकले होते, परंतु लग्न लवकरच होणार असल्याने त्यांनी काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला.

Read More