केरळमध्ये 23 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीच्या भावाची तिच्या आई-वडिलांसमोर हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळच्या कोल्लम सिटीत ही घटना घडली आहे. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीने नातं तोडल्यापासून तेजस राज तिच्या कुटुंबावर नाराज होता. प्रेयसीच्या कुटुंबाने तिचं लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरवलं होतं.
सोमवारी संध्याकाळी जवळपास 7 वाजण्याच्या सुमारास राज प्रेयसीच्या घरी पोहोचला. यानंतर त्याने 21 वर्षीय फेबिन जॉर्ड गोमेजची हत्या केली. या हल्ल्यात फेबिनचे वडीलही जखमी झाले.
यानंतर, राजने काळा पोशाख परिधान केला ज्यामध्ये त्याचा चेहरा अर्धवट झाकला होता. त्याने सुमारे 3 किमीपर्यंत गाडी चालवली. यानंतर रेल्वे रुळाजवळ थांबून त्याने आत्महत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं. गाडीतून पेट्रोलच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. राजचे वडील पोलीस उप-निरीक्षक आहेत.
पोलिसांनी सांगितलं आहे की, राज आणि फेबिनची बहिण अनेक वर्ष एकमेकांचे वर्गमित्र होते. त्यांनी एकाच संस्थेतून उच्च माध्यमिक आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतलं होतं.
"जरी ते वेगवेगळ्या समुदायाचे होते, तरी त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्या नात्याला विरोध नव्हता. दरम्यान, तरुणीला एका आघाडीच्या बँकेत नोकरी मिळाली, परंतु पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरीसाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेला तेजस राज शारीरिक चाचणी उत्तीर्ण होऊ शकला नाही. यामुळे तो निराश झाला आणि ती तरुणी नात्यापासून दूर गेली असं म्हटलं जात आहे. तरुणीने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी त्याला तिला त्रास देण्यापासून रोखले. हे हत्येसाठी चिथावणी देणारं ठरल्याचं दिसत आहे," असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
फेबिनच्या आईने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, मुलीचं लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरवल्याचा राग राजच्या मनात होता. राज आमच्या घरी मुलासह आम्हालाही ठार करण्यासाठी आला होता असा दावाही त्यांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फेबिनच्या हत्येपूर्वी राजने आधी त्याच्या वडिलांवर हल्ला केला होता. यानंतर फेबिनची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. सीसीटीव्हीत फेबिन हल्ल्यानंतर पळत बाहेर जाताना आणि कोसळताना दिसत आहे. यानंतर स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि काळ्या कपड्यांमध्ये फिरणाऱ्या संशयिताचा शोध सुरु केला. यावेळी त्यांना जवळच्या परिसरात अशीच एक व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं.