Marathi News> भारत
Advertisement

तरुणाने गर्भवती श्वानाला घरी नेऊन केला बलात्कार, शेजाऱ्यांनी पाहताच पळत गच्चीवर गेला अन्...; पोलीसही हादरले

एका कुत्रीसह अनैसर्गिक कृत्य केल्याने पोलिसांनी एका 28 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. इतकंच नाही तर तरुणाने कुत्रीवर बलात्कार केल्यानंतर श्वानाला तिसऱ्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं.   

तरुणाने गर्भवती श्वानाला घरी नेऊन केला बलात्कार, शेजाऱ्यांनी पाहताच पळत गच्चीवर गेला अन्...; पोलीसही हादरले

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणाने एका भटक्या कुत्रीसह अनैसर्गिक कृत्य केलं आहे. संतापजनक बाब म्हणजे, ही कुत्री गर्भवती आहे. पोलिसांनी या आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपी तरुणाने फक्त अनैसर्गिक कृत्यच केलं नाही, तर तिला घराच्या तिसऱ्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. ही घटना समोर आल्यानंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आरोपीने हे कृत्य केलं. आरोपी कुत्रीवर  बलात्कार करत असतानाच एका शेजाऱ्याने त्याला पाहिल्याने घटना उघडकीस आली. यानंतर त्याच्या घराबाहेर गर्दी जमा झाली होती. यामुळे घाबरलेल्या आरोपीने आपल्या घराच्या बाल्कनीतून कुत्रीला खाली फेकून दिलं. पोलिसांनी या आरोपीची ओळख जाहीर केलेली नाही. आरोपीची ओळख उघड झाल्यास त्याचे परिणाम उमटण्याची भीती पोलिसांना आहे. 

सोशल मीडियावर जखमी कुत्र्याचे काही फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये नोएडामधील प्राणीमित्र अॅडव्होकेट विशाल गौतम यांनी जखमी अवस्थेत असलेली पीडित कुत्री दाखवली आहे. फोटोत ती रक्तबंबाळ असून, तिच्याभोवती कपडा गुंडाळल्याचं दिसत आहे. ही भटकी कुत्री असल्याचा दावा केला जात आहे. पण तिच्या गळ्याभोवती असणारा पट्टा पाहता ती पाळलेली दिसत आहे. 

"शेजाऱ्याने पाहिलं तेव्हा आरोपी गर्भवती कुत्रीवर बलात्कार होता. यानंतर त्याने ही धक्कादायक घटना उघड केली," अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान आरोपीने कुत्रीला तिसऱ्या माळ्यावरुन फेकून दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. 

"शेजारी ओरडत असल्याचं ऐकल्यानंतर आरोपीने बाल्कनीतून कुत्रीला खाली रस्त्यावर फेकून दिलं. कुत्री जखमी झाली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे," अशी माहिती विनोदकुमार मिश्रा या अधिकाऱ्याने दिली आहे. आरोपी एका खासगी बांधकाम कंपनीत कामाला आहे. गुन्हा केला तेव्हा तो नशेत होता असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान जखमी कुत्रीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Read More