Marathi News> भारत
Advertisement

मित्रासाठी काय पण! बुलेटची टाकी काढून पेट्रोल पंपावर घेतली धाव, Video Viral

अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर एक व्यक्ती दिसते आहे.

मित्रासाठी काय पण! बुलेटची टाकी काढून पेट्रोल पंपावर घेतली धाव, Video Viral

Social Media Viral video: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावर एक व्यक्ती दिसते आहे. त्या व्यक्तीला आपल्या बुलेटमध्ये पेट्रोल भरायचे होते परंतु त्याला काही करून ते मिळत नव्हते. त्यासाठी त्या व्यक्तीने चक्क आपल्या बुलेटची टाकीच काढली आणि पेट्रोल पंपांवर त्यात पेट्रोल भरण्यासाठी गेला. 

त्या व्यक्तीला कोणीच पेट्रोल दिलं नाही त्यामुळे त्याने आपल्या बुलेटची टाकी पेट्रोल पंपावरच आणली आणि त्या टाकीत पेट्रोल भरून घेतले. 

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव सुशील कुमार आहे आणि ते माजी नगरसेवक आहेत. 

सुशील कुमार यांच्या मित्रासोबत अपघात झाला होता आणि त्याचवेळी त्याच्या बुलेट बाईकचे पेट्रोलही संपले होते अशी माहिती कळते. त्यामुळे आपल्या मित्राला मदत कशी करावी याबद्दल त्यांना काहीच सुचले नाही. ते जे मिळेल त्या गोष्टीतून पेट्रोल घेऊन येयच्या प्रयत्नात होते. पण शेवटी आपल्या बाईकची टाकी त्यांनी काढली आणि ते सरळ पेट्रोल पंपावर गेले. 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने पसरत आहे. सोशल मीडिया यूजर्सना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.  

Read More