केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने राहत्या घरात पत्नीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार आणि संगीता अशी त्यांची ओळख पटली आहे. त्यांच्यातील भांडणं आणि वाद या घटनेला कारणीभूत ठरल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दांपत्याचा मागे अमिषा आणि अक्षरा नावाच्या दोन मुली आहेत.
सोमवारी सकाळी 52 वर्षीय कृष्णकुमारने केरळमधील आपल्या घरातून प्रवास सुरु केला होता. 83 किमी प्रवास करुन त्यांनी कोईम्बतूर गाठलं. तिथे तो आपली पत्नी संगीताला भेटला. संगीता खासगी शाळेत शिक्षिका होती. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादातून कृष्णकुमारने संगीतावर गोळ्या झाडून तिला ठार केलं.
यानंतर कृष्णकुमार आपल्या गाडीकडे आले आणि परतीचा प्रवास सुरु केला. घरी पोहोचल्यानंतर त्याने वडिलांसमोर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी त्याने एअर गनचा वापर केला.
गोळीचा आवाज ऐकताच शेजारी धावत पोहोचले होते. यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता कृष्णकुमार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कृष्णकुमारने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराशी मैत्री करण्यास मनाई केली होती. अनेक अहवालांवरून असे दिसून येते की दोघे वेगळे राहत होते आणि कायदेशीररित्या वेगळे होण्याची चर्चा केली होती. कृष्णकुमार पूर्वी मलेशियामध्ये काम करत होता आणि परत कोइम्बतूरमध्ये स्थायिक झाला होता.