Marathi News> भारत
Advertisement

साप पकडल्यानंतर जीभेला किस करण्याचा प्रयत्न, पुढे काय झालं पाहा; अंगावर काटा आणणारा VIDEO

Viral Video: स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी असणारा कुमार हा दारुच्या नशेत होता आणि स्टंट केला तेव्हा धुम्रपान करत होता.   

साप पकडल्यानंतर जीभेला किस करण्याचा प्रयत्न, पुढे काय झालं पाहा; अंगावर काटा आणणारा VIDEO

Viral Video: सोशल मीडियावरील रीलच्या नादात एका 50 वर्षीय व्यक्तीने सापाला किस करण्याचा प्रयत्न केला असता, रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. शेतकरी असणारा कुमार सध्या रुग्णालयात जीवन मृत्यूशी झुंज देत आहे. हा व्हिडीओ सोशळ मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून टीका आणि संताप व्यक्त करत आहेत. 

ही घटना शुक्रवारी संध्याकाळी अमरोहा जिल्ह्यातील हैबतपूर गावात घडली. जितेंद्र कुमार या अल्पभूधारक शेतकऱ्याने एका सापाला वाचवलं आणि नंतर त्याच्यासोबत एक नाट्यमय व्हिडिओ शूट करण्याचा निर्णय घेतला. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमारने साप हातात घेतला आणि स्टंट करण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिथे आजुबाजूला लोकांनी गर्दी केली होती. स्थानिकांनी सांगितल्यानुसार, जितेंद्र कुमार दारुच्या नशेत होता आणि घटना घडली तेव्हा धुम्रपान करत होता. 

एका व्हिडीओ कुमारने सापाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळलं असून, नंतर आपल्या तोंडाच्या दिशेने आणताना दिसत आहे. सापाला आपल्या जीभेजवळ आणून तो उपस्थितांना आश्चर्यचकित करण्याचा प्रयत्न करतो. याच प्रयत्नात साप त्याचा चावा घेतो आणि उपस्थिातांमध्ये एकच आरडाओरड सुरु होते. 

सापाने दंश केल्यानंतर जितेंद्र कुमार यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात होते. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि नंतर मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आलं. उपचार सुरु अशून, प्रकृती अजूनही गंभीर आहे. 

गावाचे प्रमुख जयकिरत सिंह म्हणाले की, शुक्रवारी संध्याकाळी परिसरातील भिंतीवरून एक साप बाहेर आला, ज्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली होती. जितेंद्र कुमार यांनी हा साप पकडला होता. त्यांनी सापाला किस करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पकड सुटली आणि त्याने जीभेला दंश केला. यानंतर साप हातातून सुटला आणि झाडीत गेला. 

Read More