Bengaluru Triple Talaq: एका मुस्लिम महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. हलिमा सादियाने आरोप केला आहे की, तिच्या पतीने मोठ्या नेत्यांसारख्या प्रभावशाली लोकांसह शारिरीक संबंध ठेवण्यासाठी मजबूर केलं. पतीने याला एका प्रकारचा धंदाच बनवला होता असा तिचा आरोप आहे. जेव्हा पीडितेने नकार दिला तेव्हा, त्याने पत्नीला बेदम मारहाण केली आणि सहा वेगवेगळ्या क्षणी तीन तलाक दिला. धक्कादायक म्हणजे, सासऱ्याचीही सूनेवर वाईट नजर होती. बंगळुरुत हे प्रकरण चर्चेत आहे.
बंगळरुच्या बनशंकरी पोलीस ठाण्यात महिलेने आपला पती युनूस पाशाविरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने पतीविरोधात गैरवर्तन, शोषण आणि एकावेळी तीन तलाक दिल्याचा आरोप आहे. भारतात या प्रथेवर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. तरीही, असे प्रकार थांबलेले नाहीत. हलिमा सादिया यांनी आरोप केला की, तिला पतीचं मानसोपचारिक वर्तन सहन करण्यास भाग पाडलं जात होते. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळानंतर अखेर हतबल होऊन पोलीस स्टेशन गाठलं.
पीडितेने पोलीस तक्रारीत दावा केला आहे की, पतीने आपल्याला राजकीय नेत्यांसह इतर प्रभावशाली लोकांसोबत शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडत देहविक्री व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. आपल्या इच्छेविरोधात गर्भपात करायला लावला असाही महिलेचा आरोप आहे. हलिमाने आरोप केला आहे की, तिच्या पतीने एकदा धमकावताना तिच्यावर बंदूक ताणली होती. तसंच तिच्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवत धमकावत असे.
लैंगिक शोषण फक्त इतक्यापुरतं मर्यादित नव्हतं. हलिमाने आपल्या सासू आणि सासऱ्यांवर अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. तिने दावा केला आहे की, सासरा रोज बॉडी मसाजची मागणी करायचा. कौटुंबिक जबाबदारीचा भाग म्हणून तिच्यावर दबाव टाकत असे.
तिने असाही आरोप केला आहे की, सासरचे लोक हुंड्याची मागणी करत असते आणि सतत तिचा शारिरीक आणि मानसिक पद्धतीने छळ करत असत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत हलिमाने दावा केला आहेकी, तिचा पती नियमितपणे दुसऱ्या महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवायचा. तसंच तिला दुसऱअया पुरुषांसह शारिरीक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करायचा. बनशंकरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.