Marathi News> भारत
Advertisement

पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचला, भावांनी गुंडांना सुपारी दिली; पण त्यानंतर आला मोठा ट्विस्ट

राजीव यांच्यावर बरेलीमधील घरी एकूण 11 लोकांनी हल्ला केली. त्यांचे हात आणि पाय तोडण्यात आले. त्यांना जिवंत गाडण्याची योजना होती. मात्र नशिबाने काही वेगळीच तयारी केली होती.   

पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचला, भावांनी गुंडांना सुपारी दिली; पण त्यानंतर आला मोठा ट्विस्ट

उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका व्यक्तीला त्याच्या सासरच्यांकडून करण्यात आलेल्या कथित हत्येच्या प्रयत्नानंतर जंगलातून वाचवण्यात आलं. डॉक्टरचा सहाय्यक म्हणून काम करणारे राजीव यांचे हात आणि पाय मोडण्यात आले होते. याच अवस्थेत ते जंगलात सापडले. त्यांना एका अनोळखी व्यक्तीने रुग्णालयात दाखल केले. ही घटना इज्जतनगर पोलिस स्टेशन परिसरात घडली. राजीव यांची पत्नी साधना हिने हत्येची योजना आखली होती. तिने तिचे पाच भाऊ भगवान दास, प्रेमराज, हरीश आणि लक्ष्मण यांना हत्येसाठी गुंडांना सुपारी देण्याची जबाबदारी सोपवली होती. 

21 जुलैच्या रात्री एकूण 11 लोकांनी राजीव यांच्या घरी घुसून त्यांच्यावर हल्ला केला. त्यांचे हात आणि पाय मोडण्यात आले. त्यांना जिवंत पुरण्याची योजना होती. त्यांनी त्याला सीबी गंज परिसरातील जंगलात नेले आणि पुरण्यासाठी खड्डा खणला. पण नशिबात काही वेगळंच होतं. राजीव यांना पुरण्यापूर्वीच एक अनोळखी व्यक्ती घटनास्थळी पोहोचली आणि आरोपींना पुरण्याची योजना अर्धवट सोडून पळ काढावा लागला. 

राजीव यांना तिथेच टाकून आरोपींनी पळ काढला. हात, पाय मोडले असल्याने ते वेदनेने विव्हळत होते. मदत मागण्यासाठी ओरडावं इतकेही त्राण त्यांच्यात नव्हते. पण एका अज्ञात व्यक्तीने त्यांना पाहिलं आणि मदतीसाठी धाव घेतली. यानंतर राजीव यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला. सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

राजीवचे वडील नेत्राम यांनी त्यांच्या सून आणि तिच्या भावांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यांनी हल्लेखोरांना अटक करण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राजीव बरेलीच्या नवोदय रुग्णालयात एका डॉक्टरचे वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करतात. 2009 मध्ये त्याचे साधनासोबत त्यांचं लग्न झालं, त्यांना यश (14) आणि लव (8) अशी दोन मुलं आहेत. दोघेही एका खासगी शाळेत शिकतात. त्यांचे गावात एक घर होते, परंतु ते आणि त्यांची पत्नी शहरात राहत होते, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. पत्नीला गावात राहायचे नसल्याने त्याने शहरात राहण्याची जागा भाड्याने घेतली होती, असा दावा त्यांच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान हत्येचा प्रयत्न का केला याचं कारण समोर आलेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Read More