Marathi News> भारत
Advertisement

आपच्या संजय सिंह यांचे वार्षिक उत्पन्न २२४ रुपये

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी आपल्या उत्पन्नाची माहिती दिली आहे. 

आपच्या संजय सिंह यांचे वार्षिक उत्पन्न  २२४ रुपये

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी आपल्या उत्पन्नाची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांची रोजची कमाई १ रुपयांपेक्षाही कमी आहे.

२२४ वार्षिक उत्पन्न 

 संजय सिंह यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांनी २०१६ च्या आर्थिक वर्षात २२४ रुपयांचे एकूण उत्पन्न जाहीर केले.

त्याच्या घोषणापत्रानुसार,  त्यांची पत्नी अनिता सिंग यांची हिचे एकूण उत्पन्न ४९.८७४ रुपये आहे.५९,४९९ रुपयांच्या चल संपत्तीची घोषणा केली.

सुशील गुप्तांनीही केली संपत्ती घोषित 

दुसरीकडे, आम आदमी पार्टीच्या राज्यसभेसाठी आणखी एक उमेदवार सुशील गुप्ता यांनीही आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे.

२०१६-१७ च्या आर्थिक वर्षात त्यांनी आपल्या एकूण उत्पन्न ६ लाख ६५ हजार १३१ रुपये असल्याची घोषणा केली.

या काळात त्यांच्या पत्नीचे एकूण उत्पन्न ७ लाख ७ हजार ८४० रुपये होती.

Read More