Marathi News> भारत
Advertisement

Kerala Mass Murder: '...म्हणून मी प्रेयसीलाही ठार केलं', कुटुंबातील 5 जणांची हत्या कऱणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा, 'ती एकटी...'

Kerala Mass Murder: हत्या केल्यानंतर आरोपी अफनने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं होतं. त्यानेही विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्नही केला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.   

Kerala Mass Murder: '...म्हणून मी प्रेयसीलाही ठार केलं', कुटुंबातील 5 जणांची हत्या कऱणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा, 'ती एकटी...'

Kerala Mass Murder: केरळमधील सामूहिक हत्याकांडाने खळबळ उडाली असताना 23 वर्षीय आरोपी अफनने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. अफनने एकूण सहा जणांची हत्या केली ज्यामध्ये त्याच्या प्रेयसीचाही समावेश होता. मी तिला ठार केलं कारण ती माझ्याशिवाय फार एकटी पडली असता असा खुलासा आरोपीने पोलिसांकडे केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतानाच ही नवी माहिती समोर आली आहे. 

हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस स्टेशन गाठत आत्मसमर्पण केलं होतं. यानंतर त्याने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रकृती सुधारली आहे. त्याची चौकशी करण्यात आली असून, अटक करण्यात आली आहे. केरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफनची प्रकृती आता स्थिर असून त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी पोलिसांनी या हत्यांमागे आर्थिक कारण असू शकतं असा अंदाज वर्तवला आहे. 

'मी आई आणि प्रेयसीसह 6 लोकांना ठार केलं आहे,' विष पिऊन तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठलं, अधिकारी हादरले

 

याआधी अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, आरोपीने 14 कर्जदारांकडून 65 लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. सुरुवातीला त्याने त्याच्या आई आणि भावासह आत्महत्या करण्याची योजना आखली होती. 24 फेब्रुवारीला अफानने त्याच्या 88 वर्षीय आजी, 13 वर्षीय भाऊ, प्रेयसी, काका आणि काकाच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.

तिरुअनंतपुरम ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुख सुदर्शन के एस यांनी सांगितलं आहे की, "कुटुंब आर्थिक संकटात होते. त्याने एका वित्तीय संस्थेकडून 40 हजारांचं कर्ज घेतलं होतं. आरोपीने  कुटुंब आत्महत्या करण्याचा विचार करत होतं असा दावा केला आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही. आरोपीची प्रकृती सध्या बरी आहे. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला डिस्चार्ज मिळण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतील. त्याची आईदेखील बरी होत आहे; ती बोलू शकते, परंतु तिला काय घडले ते आठवत नाही. आर्थिक संकट हे त्याने हा गुन्हा करण्यामागील एक कारण होते. त्याचे रक्ताचे नमुने वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपीला अटक केली जाईल आणि त्याला रिमांडमध्ये घेतले जाईल आणि पुढील चौकशीसाठी त्याला पोलिस कोठडीत नेलं जाईल".

आरोपीच्या वडिलांनी आमच्यावर कोणताही आर्थिक भार नव्हता असं सांगितलं आहे. त्यांना मुलाने हे कृत्य नेमकं का केलं याची कोणतीही कल्पना नाही. पण कुटुंबात कोणतीही आर्थिक समस्या नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे. 

अफानने आपल्या आईवरही निर्घृणपणे वार केले होते. पण या हल्ल्यातून त्याची आई वाचली आणि आता तिच्यावर उपचार सुरु आहेत. 23 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आलं असून, त्याला 13 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. 

वेंजरमुडू आणि पांगोड या दोन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी या हत्या झाल्या. गुरुवारी झालेल्या त्याच्या अटकेची नोंद पांगोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यासाठी करण्यात आली, तर इतर गुन्ह्यांसाठी अटक नंतर नोंदवली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read More