Marathi News> भारत
Advertisement

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबईतून अटक

कामरान खान असे त्याचे नाव असून त्याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबईतून अटक

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिल्याप्रकरणी यूपी एटीएफने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. कामरान खान असे त्याचे नाव असून त्याला मुंबईत चुनाभट्टीतून ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांच्या मदतीने एटीएफने ही कामगिरी केली. 

हे वाचा : उत्तर प्रदेशात योगी आणि प्रियंका गांधींमध्ये 'लेटरवॉर'

कामरान अमीन खान असे आरोपीचे पूर्ण नाव असून तो २५ वर्षांचा आहे. झवेरी बाजार येथे तो सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत असून मांडवी येथे राहणारा आहे. तो अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे तपासात समोर आले आहे. 

मुंबई न्यायालयाकडून कागदेशीर कार्यवाही झाल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशला नेण्यात येणार आहे.  

Read More