Marathi News> भारत
Advertisement

आधारकार्ड ओळखणार तुमचा चेहरा

तुमची ओळख पटवून देणारं आधारकार्ड आता तुमचा चेहेराही ओळखणार आहे. आधारकार्डमध्ये ही तरतूद आता जोडली जाणार आहे.

आधारकार्ड ओळखणार तुमचा चेहरा

मुंबई : तुमची ओळख पटवून देणारं आधारकार्ड आता तुमचा चेहेराही ओळखणार आहे. आधारकार्डमध्ये ही तरतूद आता जोडली जाणार आहे.

१ जुलैपासून 

'युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया' म्हणजेच 'यू आय डी ए' आय येत्या १ जुलैपासून ही प्रणाली पुरवणार आहे.

यासाठी सध्या आधारकार्डद्वारे चेहेरा ओळखण्यासाठीच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना फायदा 

या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हाताचे ठसे पुसले गेलेल्या वृद्धांना चेहरा ओळखण्याच्या आधारकार्डमधल्या या सुविधेचा फायदा मिळणार आहे. 

नागरिकत्वाचा पुरावा 

 आतापर्यंत १२ अंकाचा आधार नंबर ११७ कोटी जनतेला जारी करण्यात आला आहे. याचा उपयोग ओळख पटवण्यासाठी होतो पण हा नागरिकत्वाचाही मोठा पुरावा मानला जातो. 

५० हजार कोटींची बचत 

 आधारच्या आधारेच गॅस सबसिडी आणि वेगवेगळ्या योजनेत सरकारी मदत दिली जाते. आधार योजनेमुळे आतापर्यंत ५० हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. 

Read More