Aditya-L1 Mission: भारताच्या आदित्य L-1 सूर्ययानानं सूर्याचे 11 रंग दाखवले आहेत. आदित्य- L1 ने सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सूर्याचा पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो कॅप्चर केले आहेत. इस्रोने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. हे सर्व फोटो 200 ते 400 नॅनोमीटर व्हेवलेन्थमधील आहेत. या फोटोच्या मदतीने सूर्याबाबातची अनेक रहस्य उलगडणार आहेत.
2 सप्टेंबर रोजी Aditya-L1 हे यान सूर्याच्या दिशेने झेपावले. भारताच्या आदित्य एल1 या सूर्ययानाबरोबर 7 वेगवेगळे पेलोड्स अवकाशात पाठवण्यात आले आहेत. सूर्याचं तापमान, अतिनिल किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि इतर संशोधन करण्यासाठी इस्त्रोने Aditya-L1 मोहिम हाती घेतली आहे.
Aditya-L1 यानावर असलाल्या SUIT पेलोड 20 नोव्हेंबर एक्टिव्ह झाला आहे. या उपग्रहाच्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने (SUIT) प्रथमच सूर्याची संपूर्ण डिस्क छायाचित्रे घेतली आहेत. या टेलिस्कोपने सूर्याच्या फोटोस्फेयर आणि क्रोमोस्फेयरचे फोटो काढले आहेत. फोटोस्फेयर म्हणजेच सूर्याचा पृष्ठभाग आणि क्रोमोस्फेयर म्हणजे सूर्याच्या बाह्य वातावरणातील पातळ थर, जो पृष्ठभागापासून 2000 किलोमीटर दूर आहे.
6 डिसेंबर रोजी सूर्याचे काही फोटो कॅप्चर करण्यात आले होते. हे लाईट सायन्स फोटो होते. मात्र, आता फुल डिस्क फोटो कॅप्चर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये सूर्यावरील डाग आणि त्याचं शांत रूप दिसत. या फोटोंच्या माध्यमातून इस्रोचे वैज्ञानिक सूर्याचा अधिक सखोल अभ्यास करू शकतील.
पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA), मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (MAHE), सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्स इंडिया (CESSI), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, उदयपूर सोलर वेधशाळा, तेजपूर विद्यापीठ आणि ISRO च्या शास्त्रज्ञांनी मिळून SUIT पेलोड तयार केले आहे.
Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) December 8, 2023
The SUIT payload captures full-disk images of the Sun in near ultraviolet wavelengths
The images include the first-ever full-disk representations of the Sun in wavelengths ranging from 200 to 400 nm.
They provide pioneering insights into the intricate details… pic.twitter.com/YBAYJ3YkUy
सौर वादळे, सौर लहरी येण्याची कारणे आणि त्यांचा पृथ्वीच्या वातावरणावर काय परिणाम होतो याबाबत Aditya-L1 संशोधन करणार आहे. सूर्याच्या कोरोनापासून निघणारी उष्णता आणि उष्ण वारे यांचा अभ्यास देखील Aditya-L1 हे यान करणार आहे. सौर वाऱ्याचा वेग आणि तापमान यांचा अभ्यास देखील केला जाणार आहे. सौर वातावरण समजून घेण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.