Operation Sindoor India Air Strike on Pakistani Blames Their Country : भारतीय सैन्यदलानं पहलगाम हल्ल्याचं सडोतोड उत्तर देण्यासाठी म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला. रात्रीच्या अंधारात भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर ही मोहिम फत्ते केली. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो हे व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानींची घाबरगुंडी उडाली असून पाकिस्तानी नागरिक सरकारला दोष देत असताना दिसत आहे. असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक पाकिस्तानी आपला सरकारला खडेबोल सुनावताना दिसत आहे. भारताचे हल्ले किती अचूक होते याबाबतही त्याने आठवणीने सांगितल्या आहेत. भारताचे हल्ले रोखण्यात पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली असल्याचं सांगताना सरकारला आत्मपरीक्षणाचा सल्ला त्यानं दिला आहे.
या व्हिडीओत पाकिस्तानी नागरिक हा बोलताना दिसतोय की "काल रात्री भारतानं पाकिस्तानवर 24 मिसाइल हल्ले केले आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळे मिसाईल हे टार्गेटच्या ठिकाणी लागले. भारतानं जे टार्गेट सेट केले होते, ते टार्गेट मिळवण्यात भारता यशस्वी ठरला आहे. त्याहुन आश्चर्याची गोष्ट म्हणजे की पाकिस्तानचं डिफेन्स हे एकाही मिसाइलला थांबवू शकले नाही. सगळे 24 च्या 24 हल्ले थांबवण्यात आपण अपयशी ठरलो. भारताला जे हवं होतं हे भारतानं मिळवलं आहे. ते म्हणतात ना भारताला आत घुसून मारायचं होतं. भारतानं खरंच तसं केलं आहे. तरी आपण त्यांच्या मिसाइलला थांबवू शकलो नाही. हे सत्य आहे. आता हे बघून तुम्ही हे बोलू नका की तुम्ही भारताची स्तुती करत आहात. जे सत्य आहे ते आहे. आपण ऐकत आलोय की इस्त्राईलनं 200 मिसाईल किंवा 400 मिसाइलनं हल्ला करतोय. 1000 मिसाइलनं हल्ला करतोय. तर इस्त्राइलमध्ये जाऊन एकच पडतोय. इस्त्राइल बरोबर सगळ्यांना थांबवण्यात यशस्वी ठरतोय. इतकी चांगली त्यांची डिफेन्स सिस्टीम आहे. आपल्याकडे बघा भारतानं 24 मिसाइल सोडले आणि आपण एकही थांबवू शकलो नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतानं कोणत्या लष्करी ठिकाणांवर हल्ला केला नाही किंवा कोणत्या छावणीवर हल्ला केला नाही. हे जर 24 मिसाइल या ठिकाणी टार्गेट करून सोडले असते तर मग सगळं संपलच असतं. हे मिसाइल कोणी थांबवले असते... कारण आपण थांबवूच शकलो नाही. एकही थांबवू शकलो नाही."
पुढे तो व्यक्ती म्हणाला, "दुसरी अफवा रात्री ही पसरवण्यात येत होती की मीडिया आणि सोशल मीडियावर चर्चा होती की पाकिस्ताननं भारताचे फायटर जेट्सवर हल्ला केला आहे. सगळे फोटो मी पाहिले ते 8 महिने जुने आहेत. तर काही 3 वर्ष जुनी आहेत. आपण भारताचं जनरल हेडकॉर्टर उडवलं आणि काय नाही. ते सगळं मी सर्च केलं सगळं खोटं निघालं."