Marathi News> भारत
Advertisement

Pubg नंतर आता Free Fire लव्ह स्टोरी, एकमेकांसाठी घर सोडलं अन् मग...

Free Fire Game Love Story : सीमा आणि सचिनच्या नंतर अजून एका जोडप्याची लव्ह स्टोरी सोशल मीडियावर चर्चेली जाते. Pubg नंतर आता Free Fire गेम खळताना ही प्रेम कहाणी सुरु झाली आहे. 

Pubg नंतर आता Free Fire लव्ह स्टोरी, एकमेकांसाठी घर सोडलं अन् मग...

Free Fire Game Love Story : सीमा हैदर आणि सचिन यांची प्रेम कहाणी ही PUBG मधून सुरु झाली. आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये Free Fire Game खेळत असताना 21 वर्षांय तरुणी बिहारमधील सुजीत नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. ही मुलगी उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील तर तो बिहारचा...या दोघांचा Free Fire Game वरुन संपर्क झाला. खेळामुळे यांचं बोलणं सुरु झालं. या गेममुळेच त्यांच्यामध्ये संवाद वाढत गेला आणि या संपर्काचं रुपांतर प्रेमात झालं.  (after seema sachin pubg love affair Free Fire Game gorakhpur girl bihari Boy Love Story Trending news )

कसं आलं प्रेम प्रकरण समोर?

खरं तर या दोघांचं प्रेम प्रकरण समोर यांचं कारण ठरलं ते म्हणजे या प्रेमातून या 21 वर्षीय तरुणी अचानक एक दिवस बेपत्ता झाली. कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यासाठी सुरु केली पण तिचा कुठे छडा लागत नव्हता. कुटुंबातील सदस्यांना मुलगी प्रियकरासह पळून गेल्याचे नातेवाईकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. कुटंबीयांनी पीपीगंड पोलीस ठाण्यात तिची तक्रार केली. पोलिसांनीही तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हाही नोंदवून घेतला. 

पाकिस्तानच्या सीमा हैदर ही नोएडाच्या सचिनच्या प्रेमात चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात दाखल झाली. तर फ्री फायर खेळातून 21 वर्षीय तरुणी गोरखपूरमधून बिहारला पोहोचली. प्रेमासाठी ती 31  जुलैला दोघेही घरातून फरार झाले. मुलगी अभ्यासाच्या बहाण्याने मोबाईलवर तासंतास गेम खेळायची, पालकांनी सांगितलं. ते म्हणाला की, आम्हाला वाटायचं ती अभ्यास करत आहेत. त्यामुळे  मोबाईलमध्ये नेमकं काय करतेय याकडे आमचं लक्ष नव्हतं. 

पण ती रात्रभर मोबाईलवर असलायची, पण ती अभ्यास नाही तर गेम खेळायचे याची आम्हाला कल्पनाही नव्हती. कुटुंबियांच्या तक्रारानंतर या दोघांचा शोध सुरु असल्याचं पीपीगंज पोलीस स्टेशचे प्रभारी आशिष सिंह यांनी माहिती दिली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या दोघांचे लोकेशन बिहारची राजधानी पाटणामध्ये मिळाले आहे.

हेसुद्धा वाचा - Viral Video :आईकडूनच लेकाचा खेळ खल्लास; लेकाच्या गर्लफ्रेंडला असं काही सांगितलं की...

पोलिसांनी सांगितलं की, तरुण हा पाटण्यात ऑटो रिक्षा चालवत. दरम्यान मुलगी 21 वर्षांची असल्यामुळे तिचा शोधल्यावर खरं प्रकरण समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल. 

Read More