Dmart Profit : आजकाल सगळेच DMart मधून महिन्याभरातील सामान खरेदी करतात. त्याच एकच कारण म्हणजे आपले पैसे मोठ्या प्रमाणात वाचतात. महत्त्वाचं म्हणजे DMart मध्ये सामान घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे बाजारापेक्षा तिथे कमी दरात तुम्हाला घरातील सामान मिळतो. पण त्यांच्याकडून इतके लोकं हे सामान घेतात मग त्यांना हे कसं परवडतं? त्यांचा यात फायदा कसा होतो?
भारतात कुठे स्वस्तात सामान मिळत असेल तर ते डीमार्टमध्ये मिळतं. नव्या आणि विकसित होत असलेल्या शहरांमध्ये मेट्रो शहरांपर्यंत, डीमार्टवर प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. आता डीमार्ट म्हणजे स्वस्तात सामान अशी त्याची ओळख झाली आहे. देशातील मध्यमवर्गीय कुटुंब हे आज त्यांचा महिन्याचा सामान भरण्यासाठी डीमार्टला जातात. इतकंच नाही तर नियमितपणे म्हणजे घरात घालणारे कपडे आणि किचनचा सामान देखील लोकं डीमार्टमधून खरेदी करतात. आजच्या ऑनलाइनच्या काळात डीमार्टमध्ये अनेक बडे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सला टक्कर देत आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे की इथे सामान हे स्वस्तात मिळतं. त्यातही जिथे DMart सुरु होतं त्याच्या आजुबाजूच्या परिसराची किंमत ही वाढू लागते. लोकांना वाटतं की डीमार्टनं अशा ठिकाणी गुंतवणूक केली आहे जिथे पुढे जाणून चांगला फायदा होईल.
डीमार्टच्या यशामागे राधाकिशन दामानी यांनी लावलेली युक्ती आहे. दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला देखील यांना गुरु मानत होते. राधाकिशन दामानी देशाचे सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत आहेत. त्यांची संपत्ती ही 1 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की राधाकिशन दामानी यांनी फक्त 12 वी पर्यंत शिक्षण केलं आहे. असं असलं तरी त्यांच्या युक्तीमुळे आज त्यांची कोट्यावधींची संपत्ती होती.
शेअर बाजारात दामानी यांचं चांगलं नाव होतं असं असताना त्यांनी ते सोडून स्वत: चा बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. 1999 मधअये त्यांनी नेरुळमध्ये सगळ्यात पहिली फ्रेंचायझी घेतली. ती अपयशी ठरली. त्यानंतर त्यांनी बोरवेल बनवण्याचं काम सुरु केलं, पण ते यातही अपयशी ठरले.
2002 मध्ये मुंबईत त्यांनी पहिलं डीमार्ट स्टोर सुरु केलं. त्यांनी हे ठरवलं की भाड्याच्या ठिकाणी डीमार्ट स्टोअर सुरु करणार नाही. आज डीमार्टचे संपूर्ण देशात 300 पेक्षा जास्त स्टोर्स आहेत. त्याचा अर्थ हाच आहे की राधाकिशन दामानी यांच्याकडे फक्त डीमार्ट स्टोर्स नाहीत, तर त्यासोबत भारतात 300 ठिकाणी प्रॉपर्टी देखील आहेत. तर त्यांचे हे स्टोर्स 11 राज्यांमध्ये आहेत.
स्वस्तात सामान विकूनही राधाकिशन दामानी यांना फायदा कसा होतो. तर सगळ्यात पहिलं म्हणजे भाड्याच्या ठिकाणी ते डीमार्ट सुरु करत नाही. त्यामुळे त्यांचं रनिंग कॉस्ट खूप कमी होतं. ते आपल्या जमिनीवरचं स्टोर सुरु करतात. ज्यामुळे तुम्हाला नेहमी भाडं देण्याची चिंता सतावत नाही. त्यामुळे देखील त्यांना सामानावर थोडी सूट देण्यात काही हरकत वाटत नाही.
DMart त्याचा स्टॉक हा 30 दिवसांच्या आता विकण्यात येतो आणि नवीन माल मागवतात. मोठ्या प्रमाणात लोकांनी यावं यासाठी डिस्काउंट देण्यात येतात. डीमार्ट कंपनीकडून सामान घेताना त्यांना लगेच पैसे देतात, जेणे करून त्यांना देखील त्या मालावर डिस्काऊंट घेता येतो. इतकंच नाही तर काही कंपन्यांमधून प्रोडक्टला चांगल्या पद्धतीनं डिस्प्ले करण्यासाठी आणखी चांगली सूट मिळते किंवा ते डीमार्टला पैसे देखील देतात. ग्राहक हे रॅकमध्ये सगळ्यात वरती ठेवलेला सामान किंवा सगळ्यात खाली असलेल्या सामानाकडे ना पाहतात किंवा घेतात. त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर जे दिसतं ते सामान ते खरेदी करतात. तर कंपन्यांना योग्य ती जागा विकून देखील डीमार्ट पैसे कमावते.
हेही वाचा : नागार्जुन यांचा धाकटा मुलगा अखिल अडकला लग्न बंधनात; गर्लफ्रेंडसोबत घेतल्या सप्तपदी PHOTO VIRAL
अशा प्रकारे DMart त्यांच्या खर्चावर 5-7 टक्के वाचवतो आणि त्याला डिस्काउंट म्हणून ग्राहकांना देतो. हेच कारण आहे की DMart आजही भारतातील सगळ्यात स्वस्त आणि विश्वासू रिटेल चेन ठरली आहे.