Marathi News> भारत
Advertisement

Agra Accident: वेगवान कार कंटनेरला धडकली, ५ जण जिवंत जळाले

आगरामध्ये यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात

Agra Accident: वेगवान कार कंटनेरला धडकली, ५ जण जिवंत जळाले

नवी दिल्ली : आगरामध्ये यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय. लखनऊहून दिल्लीला जाणाऱ्या कारला भीषण अपघात झाला असून त्यातील ५ जण जिवंत जळाले. आगराच्या खंदौली विभागात कार पोहोचल्यानंतर हा अपघात झाला. कार वेगात असल्याने थेट जाऊन कंटेनरवर आदळली. ही टक्कर एवढी जोरदार होती की यामुळे मोठा आवाज येऊन कारला आग लागली. 

कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याआधीच आतील प्रवासी आगीने विक्राळ रुप धारण केले. आतल्या पाच जणांचा जळून मृत्यू झाला. भीषण आगीमुळे बाजुने जाणाऱ्यांचेही जवळ जाण्याचे धाडस झाले नाही. या अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलंय. 

Read More